गरज ही अविष्काराची जननी असते. पण विकण्याच्या नादात बाजारात अशा काही वस्तू असतात, ज्यांची आपल्या काही खास गरज नसते. काही वस्तूंचं डिझाइन आणि पॅकेजिंग असं असतं की, त्या वस्तू विकत घेण्याचा विचारही केला जात नाही. अशाच काही विचित्र वस्तू आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्या पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही.
१) Licki Brush
(Image Credit : coolstuff.com)
ही वस्तू तोंडाला लावून तुम्ही तुमच्या मांजरीला चाटू शकता. याने मांजरीला चांगलं वाटेल. मांजरीचे केस आपल्या तोंडात जातात म्हणून अनेकजण मांजरीला तोंडाजवळ येऊ देत नाहीत. पण याने ते करता येईल.
२) Nail Correction Tool
(Image Credit : Social Media)
नेल कटर तुम्हाला माहीत असेलच. पण हे नेल करेक्शन म्हणजे जरा जास्तच झालं. नाही का? या नेल करेक्शनच्या माध्यमातून नखांचा आकार व्यवस्थित ठेवला जातो. हे दिसतं तर असं आहे की, याने नख उपटून टाकलं जात असावं.
३) Plunger
(Image Credit ; amazon.com)
वेस्टर्न टॉयलेटची बनावटीमुळे ते स्वच्छ करण्यास जरा अडचण येते. Plunger च्या मदतीने असं टॉयलेट आतपर्यंत व्यवस्थित स्वच्छ करता येतं.
४) Lady Anti Monkey Butt Powder
(Image Credit ; amazon.com)
हे नाव वाचल्यावरही लोक हे खरेदी करत असतील तर खरंच त्यांना सलाम. बरं हे पावडर खासकरून महिलांसाठी तयार करण्यात आलं आहे. हे पावडर खास जागांवर लावण्यासाठी उपयोगात येतं.
५) Back Hair Shaver
(Image Credit ; amazon.com)
पाठीवर साबण न लावता येण्याचं दु:खं सर्वांनाच चांगलं माहीत आहे. पण ही वस्तू त्यांच्यासाठी आहे, जे लोक पाठीवरील केसांमुळे हैराण आहेत. ही खरंच कामाची वस्तू आहे पण जरा विचित्र वाटतीय.
६) Tampon Flask
(Image Credit ; amazon.com)
ज्यांना माहीत नाही त्यांना हे सांगायचंय की, महिला Tampon चा वापर मासिक पाळीदरम्यान पॅडसारखा करतात. Tampon डिझाइन काही कंपन्यांनी कॉपी करून एक फ्लास्क तयार केलंय. ज्यात दारू लपवली जाते.
७) Pimple Popping Kit
(Image Credit ; amazon.com)
पिंपल फोडणे हा अनेकांसाठी चांगला टाइमपास असतो. अशाच लोकांना डोळ्यांसमोर ठेवून ही किट तयार करण्यात आलीये. हात घाण करण्यापेक्षा पिंपल फोडण्यासाठी ही वस्तू तयार करण्यात आली आहे.
८) Butt Pad
(Image Credit ; amazon.com)
नावावरूनच हे कळालं असेल की, हे कुठे लावतात. हे लावण्याचा उद्देश आहे प्रदूषित हवा निष्क्रिय करणे. पण याने केवळ दुर्गंधीच रोखली जाईल, आवाजावर तुम्हालाच कंट्रोल ठेवावा लागेल.