लंडन : हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, इंग्लंडमधील एका शाळेतील ही वस्तुस्थिती आहे. या शाळेने एका कुत्र्याला फुल टाइम जॉब दिला आहे. या कुत्र्याचे नाव आहे शोला. तो सकाळी स्टाफ मिटींगलाही हजेरी लावतो. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवितो. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा तणाव दूर करणे हे याचे मुख्य काम आहे. तणावात असलेल्या विद्यार्थ्याला तो नेमके शोधून काढतो. शााळेचे प्रिंसिपल म्हणतात की, शोला आपले काम अतिशय जबाबदारीने पार पाडत आहे. परिक्षेच्या पूर्वी एक विद्यार्थीनी प्रचंड घाबरलेली होती. पण, शोलाला भेटून तिचा तणाव एकदम कमी झाला आणि तिने अतिशय आनंदात परीक्षा दिली. तो एखाद्या वर्गात गेल्यावर बरोबर तणावग्रस्त विद्यार्थ्याला शोधून त्याच्याजवळ जाऊन बसतो. एकूणच काय तर हा शोला या शाळेचा अविभाज्य भाग आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचा एक मित्रही झाला आहे.
नोकरी करणारा कुत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2017 12:33 AM