शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली सफाई कामगार, Instagram युजरला पाहून घेतला निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 5:23 PM

बर्टनचे 2017 मध्ये प्रमोशन झाले. यानंतर तिचा पगार सुमारे 40 लाख रुपये झाला.  होता. पण...

एका महिलेने 40 लाखांची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि तिने सफाईचे काम करायला सुरुवात केली. क्लेअर बर्टन (Claire Burton) असे या महिलेचे नाव आहे. ती ब्रिटनची असून, क्लिनर होणे हे कॉर्पोरेट नोकरीमध्ये ईमेल लिहिण्यापेक्षा अगदी वेगळे जग आहे. तसेच हा निर्णय आपल्या करिअरचा सर्वात चांगला निर्णय होता, असे तिने म्हटले आहे.

'द सन'ने दिलेल्या वत्तानुसार, लाखो रुपयांची नोकरी सोडणारी क्लेयर बर्टन सध्या 6 ग्राहकांकडे सफाईचे काम करते. हे काम तिने इंस्टाग्राम युजर मिस हिंच (Mrs Hinch) यांच्या कडेपाहून निवडले. बर्टनने ऑगस्ट 2001 मध्ये हाय-स्ट्रीट बँकेसाठी ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची कमाई दीड लाख रुपये एवढी होती. याचदरम्यान तिने सप्टेंबर 2003 मध्ये बॉयफ्रेंड डेव्हसोबत लग्न केले.

वडिलांचा मृत्यू, पतीसोबत घटस्फोट - बर्टनचे 2017 मध्ये प्रमोशन झाले. यानंतर तिचा पगार सुमारे 40 लाख रुपये झाला.  होता. पण त्याच वर्षी बर्टनच्या वडिलांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. एका वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये तिचे लग्नही तुटले तिचा घटस्फोट झाला. या सर्व प्रकाराने तिला मोठा धक्का बसला.

स्वतःला अशा प्रकारे मजबूत बनवलं -क्लेअर बर्टन सांगते, 'तेव्हा मला वाटले होते, की आता आयुष्य संपले. पुढचे अनेक महिने मी एकटीच होते. मात्र, एका गोष्टीची मला अनपेक्षितपणे मदत झाली आणि ती गोष्ट म्हणजे स्वच्छता. बर्टनने सांगितले की, ज्या कामाचा मला नेहमी तिरस्कार वाटत असे आणि जे काम मी इतरांकडून पैसे देऊन करून घेत होते, त्याच कामाने मला धीर दिला.

बर्टन म्हणते, 'मी इंस्टाग्रामवर मिसेस हिंच यांना पाहिले आणि चार तास साफसफाई केल्याने शांतता मिळते, असे मला जाणवले. ते एक प्रकारचे ध्यानच होते. हळू-हळू जानेवारी 2019 पर्यंत, एका मार्गदर्शकाच्या मदतीने मी स्वतःला या धक्क्यातून सावरले.

नोकरी सोडली आणि साफसफाईलाच काम बनवले -कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात घरातून काम करताना बर्टनने साफसफाईचेही काम केली. यातून तिला आनंद मिळू लागला, यानंतर आपण हेच काम का करू नये? असे तिला वाटले.  मग काय, बर्टनने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ क्लिनर बनली. आता ती केवळ स्वतःचे घरच नाही तर इतरांची घरेही स्वच्छ करते. तिच्याकडे आता सहा ग्राहक आहेत.

मात्र, आता तिला तिचा खर्च कमी करावा लागणार आहे, कारण आता तिचा पगार पूर्वीसारखा नाही. बर्टन म्हणते, की माझा पगार ७० टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे. ही एक मोठी घसरण आहे. पण, माझे उत्पन्न वाढत आहे आणि माझ्या खर्चासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. मी माझे स्वप्न जगत आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडJara hatkeजरा हटकेjobनोकरी