शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

धबधब्याच्या मधोमध पाण्यात तेवत असते ज्योत, वैज्ञानिक अजूनही शोधू शकले नाही यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:11 IST

जगात असा एक धबधबा आहे, जिथं (Continuous flame burns in the middle of waterfall) सतत पाणी वाहत असूनही त्याच्या मधोमध एक ज्योत सतत तेवत असते. निसर्गात अनेकदा असे काही चमत्कार घडतात, की त्यामागचं कारण शोधणं अनेकदा अवघड असतं.

जगात असा एक धबधबा आहे, जिथं (Continuous flame burns in the middle of waterfall) सतत पाणी वाहत असूनही त्याच्या मधोमध एक ज्योत सतत तेवत असते. निसर्गात अनेकदा असे काही चमत्कार घडतात, की त्यामागचं कारण शोधणं अनेकदा अवघड असतं. जोपर्यंत अशा घटनांचं वैज्ञानिक कारण समोर येत नाही, तोपर्यंत (Magic of nature) निसर्गाचा चमत्कार म्हणूनच अशा घटनांकडं पाहिलं जातं. निसर्गाचा असाच एक (Natural magic in America) चमत्कार आहे अमेरिकेत.

धबधब्याच्या मधोमध ज्योतपाणी आणि आग यांचं एकमेकांशी विरोधाचं नातं. पाण्याने आग विझते, असा सर्वसामान्य अनुभव. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असा एका धबधबा आहे, जिथं पाण्याच्या मधोमध सतत आग तेवत असते. आगीची एक ज्योत सतत या धबधब्यात प्रज्वलित झाल्याचं दिसून येतं.

एटर्नल फ्लेम फॉलया धबधब्याचं नावच त्यात तेवणाऱ्या ज्योतीवरून पडलं आहे. हा धबधबा वर्षाचे बाराही महिने प्रवाही असतो. सतत पाणी वाहत असूनदेखील तिथं आगीची ज्योत प्रज्वलित होत राहते. यामागे नेमकं काय कारण असावं, याचं उत्तरही गेल्या अनेक वर्षांपासून शोधलं जात आहे. निसर्गाचा हा अद्भूत नजारा पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो.

जगभरातून येतात पर्यटक

निसर्गाची ही कमाल पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक या धबधब्यावर गर्दी करतात. पाण्यात आग लावणं, ही आतापर्यंत एक कवीकल्पना मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात हे घडू शकतं, याची प्रचिती या धबधब्यावर गेल्यावर येते.

हे आहे शास्त्रीय कारणधबधब्याच्या त्या विशिष्ट भागातून मिथेन गॅस बाहेर येत असल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी कुणीतरी तिथं ज्योत पेटवली असावी. मात्र त्यानंतर सातत्यानं तिथून मिथेन बाहेर पडत असल्यामुळे ही आग विझलेलीच नसल्याचा दावा काही शास्त्रज्ञ करतात. याबाबत अधिक संशोधन अद्यापही सुरूच आहे.

दैवी शक्ती असल्याची भावनाया ज्योतीमागे दैवी शक्ती असल्याची भावनाही काही भाविक मंडळी व्यक्त करतात. जोपर्यंत ही ज्योत तेवत राहते, तोपर्यंत या भागाला निसर्गापासून कुठलाही धोका नसल्याचं मानलं जातं. सर्व काही आलबेल असल्याचा संकेत म्हणूनही या ज्योतीकडं पाहिलं जातं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके