पायांमध्ये वेदना होण्याची समस्या अनेकांना उद्भवते. पायाला दुखापत झाल्यास पाय दुखतो. पण अशी काहीच कारणं नसतानाही पायात तीव्र वेदना होत असतील तर वेळीच सावध व्हा. थकवा किंवा काही घटकांच्या कमतरतेमुळे असं होत असावं असं अनेकांना वाटतं. पण सामान्य वाटणाऱ्या या वेदना म्हणजे एखाद्या भयंकर आजाराचं लक्षण असू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यूकेच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या नवऱ्याला झालेल्या खतरनाक आजाराबाबत माहिती दिली आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीचा दररोज रात्री पाय दुखायचा पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचाच परिणाम असा की नवरा वर्षभरापासून व्हिलचेअरला खिळला आहे तो आता उभाही राहू शकत नाही. ग्लेन उर्मसन असं या 59 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो 4 मुलांचा पिता आहे.गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून दररोज राजी त्याच्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्या. थकव्यामुळे पायात क्रॅम्प येत असावा असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने त्याला फार गांभीर्याने घेतलं नाही.
दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर अचानक त्याच्या पायात अधूनमधून अशा बऱ्याचदा वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ग्लेनने सांगितलं की, ऑफिसमध्ये अचानक त्याला झटके येऊ लागले. 30 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या पण तेव्हा काहीच दिसून आलं नाही. तेव्हा त्याला घरी पाठवण्यात आलं. पण यानंतर ख्रिसमसदरम्यान त्याला पुन्हा तशाच तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याची अवस्था आणखी खराब झाली होती. त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ग्लेन आजाराचं त्यावेळी निदान झालं. त्याच्या पाठीच्या मणक्याच्या हाडात इन्फेक्शन झाल्याचं समजलं. यामुळेच त्यानंतर तो व्हिलचेअरलाच खिळला. त्याच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्लनेच्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या या आजाराबात सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली आहे आणि पायांमधील वेदनांना दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं हे सांगितलं आणि इतर लोकांना सावध केलं आहे. पायांच्या वेदनांकडे सामान्य समजून दुर्लक्ष करू नका, असं आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.