शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:40 AM

पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली.

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे ती महिला तिच्या तीन मुलींनाही सोबत घेऊन गेली आहे. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सीकर शहरातील उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, 38 वर्षीय महिलेला तिचा शेजारी मुकेश नायक याने आमिष दाखवून पळवून नेले. महिलेला तीन मुली आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 17, 12 आणि पाच वर्षे आहे. तिन्ही मुलीही त्यांच्यासोबत आहेत. याबाबत उद्योगनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुकेशला स्वतःची पाच मुलं आहेत. आरोपीने मुलींसोबत वाईट कृत्य केलं असावं, अशी भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोपीच्या तावडीतून महिलेची व तिच्या मुलींची तात्काळ सुटका करावी. आरोपी एका नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने यापूर्वी चुरू जिल्ह्यातील सुजानगढमधून निवडणूकही लढवली आहे. राजकीय दृष्टिकोनामुळे पोलीस आरोपींवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षक करण शर्मा सांगतात की पोलीस पथक या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. लवकरच विवाहित महिला सापडेल.

विशेष म्हणजे राजस्थानमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बुंदीमध्ये एका सासरऱ्याने आपल्या सुनेला नेले होते. आणि सिरोही जिल्ह्यात जावय सासूसोबत पळून गेला होता. या दोन्ही प्रकरणांची बरीच चर्चाही झाली होती. आता सीकरमध्ये घडलेली ही घटना चर्चेचा विषय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके