ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आता नवीन अॅप लॉन्च केले आहे. FB Messenger Lite असे या अॅपचे नाव असून सध्याच्या फेसबुक मेसेंजरचे हे लाईट व्हर्जन आहे. तसेच, तुमच्या मोबाईलवरील स्लो इंटरनेटवर सुद्धा हे अॅप वापरता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
फेसबुकने गेल्या काही महिन्यापूर्वी जागतिक स्तरावर FB Messenger Lite अॅपचे लॉन्चिग केले होते. त्यानंतर आज भारतात केले. अॅन्ड्राईड मोबाईल युजर्स FB Messenger Lite या अॅपला प्ले स्टोरमधून डाऊनलोड करु शकतात. याबरोबर फेसबुकचे हे नवीन अॅप आयफोन युजर्ससाठी उपलब्ध नाही आहे. अॅपमधून फेसबुक मेसेंजर वापरणा-या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही टेक्स मेसेज, फोटो आणि लिंक्स पाठवू शकता. तसेच, त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला अशाप्रकारे मेसेज तुम्हाला येऊ शकतात.
दरम्यान, जगभरात एक अब्जहून अधिक लोक फेसबुक मेसेंजरचा वापर करत आहेत. याबाबत खुद्द फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुकवरील पेजवर लिहून ही माहिती दिली होती. याचबरोबर, दिवसेंदिवस सोशल मीडिया साईटस आपापल्या युजर्सना आकर्षक सेवा देण्यासाठी तयार असणारा या फेसबुकने गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुक मेसेंजरमध्ये इन्स्टंट व्हिडिओ फिचरचा पर्याय आपल्या युजर्संना उपलब्ध करुन दिला होता.
काय आहे इन्स्टंट व्हिडिओ फिचर ?
समजा तुमच्या घरात तुमचं लहान बाळ आहे. त्या बाळाच्या बाललीला दररोज तुम्ही बघत आहात.एके दिवशी तुमचं बाळ पहिल्यांदा उभ राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा क्षण तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला .हा आनंद तुम्हाला तुमच्या जोडीदारा सोबत शेअर करायचा आहे . त्यावेळी तुम्ही काय कराल ? एकतर तुमच्या जोडीदाराला व्हिडिओ कॉल करून हे आनंददायी क्षण लाईव्ह दाखवाल किंवा तुमचा जोडीदार घरी आल्यावर त्याला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवाल . मात्र आता आणखी एक सोपा पर्याय फेसबुक मेसेंजर ने तुम्हाला उपलब्ध करून दिला तो म्हणजे इन्स्टंट व्हिडिओ. यामध्ये फेसबुक मेसेंजर वर चॅट करत असताना असे छोटे छोटे क्षण रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. म्हणजे यापुढे असा एखादा क्षण जो तुम्हाला इतरांसोबत शेअर करावा असे वाटते तो फेसबुक मेसेंजरच्या इन्स्टंट व्हिडिओ या फिचर चा वापर करून आपल्या परिजनांना पाठविता येऊ शकतो.
इन्स्टंट व्हिडिओ कसे पाठवाल ?
इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर वापरायचे असेल तर ज्याला इन्स्टंट व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्या स्मार्टफोनवर सुद्धा लेटेस्ट फेसबुक मेसेंजर ओपन असले पाहिजे तरच इन्स्टंट व्हिडिओ तुम्ही समोरच्याला पाठवू शकाल . इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर व्हिडिओ कॉलिंग पेक्षा पूर्णतः वेगळे आहे.व्हिडिओ कॉलिंगचे फिचर २०१५ पासूनच फेसबुक मेसेंजर मध्ये उपलब्ध आहे.काही वेळा आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविन्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा वेळी इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर कामी येईल.