Interesting Facts : देशात सध्या अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे घरे, गाड्या, जनावरे पाहून गेलीत. तर काही ठिकाणी सतत पाऊस सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगात एक असंही ठिकाण आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही. आता तुम्हाला वाटेल की, हे ठिकाण म्हणजे एखादा वाळवंट असेल. पण असं अजिबात नाहीये. हे एक गाव आहे जिथे बरेच लोकही राहतात.
प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेला जोडणारं हे गाव आता अल-बोहरा किंवा अल-मुकरमा लोकांचा गढ आहे. त्यांना यमनी समुदाय असंही म्हटलं जातं.
यमनी समुदायातील लोक मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्वातील इस्लाम समुदायातील आहेत. ते मुंबईत राहत होते. 2014 मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दर तीन वर्षांनी या गावाचा दौरा करत होते.
या गावाची खास बाब म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचं कारणंही तेवढं खास आहे. या गावात पाऊस पडत नाही कारण हे गाव ढगांच्या वर आहे. म्हणजे ढग
या गावाच्या खालीच तयार होता. इतकं हे गाव उंचीवर आहे. येथील नजारा असा आहे जो दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही.