अनेकांच्या आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जातं. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या 29 वर्षीय कायला सोबतही असंच काहीसं झालं. ऑस्ट्रेलियातील सगळ्यात फेमस कंटेंट क्रिएटरमध्ये कायलाचं नाव घेतलं जातं. पण काही दिवसांआधी तिच्या घरातील लोकांनी तिला धक्के मारून आपल्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढलं.
कायला सोशल मीडियावर फार फेमस आहे. इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यासोबतच कायला काही अॅडल्ट साइटवरीर कंटेंट अपलोड करते. ज्यात ओन्लीफॅन्सचाही समावेश आहे. कायला अशा लोकांपैकी आहे ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीलाच कोट्यावधी रूपयांची कमाई केली. पण आजही तिला घरातून बाहेर काढणं सलतं.
नातेवाईकांनी खराब केलं आयुष्य
आपल्या लाइफबाबतच्या गोष्टी कायलाने लोकांसोबत शेअर केल्या. तिने सांगितलं की, ती आरामात तिचे बोल्ड फोटो ऑनलाइन विकून त्यातून पैसे कमावत होती. ओन्लीफॅन्सवर सब्सक्रिप्शनची गरज असते. अशात तिला माहीत होतं की, तिच्या घरच्यांना याबाबत काही समजणार नाही. पण एक दिवस तिच्या एका नातेवाईकाने कायलाचे काही बोल्ड फोटो तिच्या वडिलांना पाठवले. जे बघताच तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं.
आजही येते घरची आठवण
आज कायला तिच्या कामातून कोट्यावधी रूपये कमाई करते. तिला तिच्या कामाबाबत काहीच पश्चाताप नाही. पण एका वाईट नातेवाईकामुळे तिला परिवारापासून दूर रहावं लागत आहे. ओन्लीफॅन्सचं सब्सक्रिप्शन असलेल्या एका नातेवाईकाने तिचे फोटो तिच्या वडिलांना पाठवले होते. त्यानंतर तिच्या घरातील लोकांनी तिला लगेच घराबाहेर हाकललं. आज कायलाकडे सगळंकाही आहे. पण तिला घरातील लोकांची खूप आठवण येते. पण तिच्या घरच्यांना तिच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाहीये.