लंकाशायर(इंग्लंड) – लंकाशायरमध्ये जानेवारीत आपल्या नवीन घरात शिफ्ट झालेल्या एका कुटुंबासोबत अजब घटना घडली. या कुटुंबाला घरातील एका रुममध्ये जुन्या घरमालकानं लिहिलेला संदेश आढळला. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. १९७५ मध्ये तत्कालीन घरमालकानं हा मेसेज घराच्या भिंतीवर लिहिला होता. तो वाचून कुटुंब हैराण झालं कारण त्यात ट्राइम ट्रॅव्हलचा उल्लेख करण्यात आला होता.
द सनच्या रिपोर्टनुसार, डैड कार्ल त्यांच्या मुलीच्या रुममध्ये वॉलपेपर फाडत होते तेव्हा त्यांना वॉलपेपर आणि पेंटच्या मध्ये जुन्या घरमालकानं लिहिलेला संदेश दिसला. कार्ल यांनी सांगितले की, माझ्या मुलीने या मेसेजचा काही हिस्सा वाचला त्यानंतर आम्ही जेव्हा वॉलपेपर हटवण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण मेसेज वाचायला मिळाला. आम्ही या मेसेजचा फोटो घेतला आणि फेसबुकवर पोस्ट केली.
४६ वर्षापूर्वी लिहिलेल्या या मेसेजमध्ये सांगितलं होतं की, मी इथं आहे आणि तुम्ही तिथं. वेळेने आपल्याला वेगळं केलंय. काय हे भविष्य आहे? का मी भूतकाळ आहे? याचे केवळ एकच उत्तर आहे. तू माझं भविष्य आहे आणि मी तुझा भूतकाळ आहे. मी तुझ्या शुभ दिवसाची अपेक्षा करतो. हा मेसेज लिहिलेल्या एलीन वाल्म्सली यांनी सहीसह या मेसेजखाली डेट लिहिली होती.
...अन् सुरू झाला एलीनला शोधण्याचा प्रयत्न
कुटुंबाला हा संदेश इतका आवडला की त्यांनी एलीनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुक पोस्ट केल्यानंतर कार्लला एलीनच्या एका फॅमिली फ्रेंडने संपर्क केला. त्यांचे नाव वाल्म्सली होतं. काही दिवसांत कुटुंबाचा एलीनसोबत संपर्क झाला त्यांचे आडनाव आता पामर होतं.
१५ वर्षाची असताना लिहिला होता मेसेज
एलीनने सांगितले की, मी खूप आनंदी आहे त्यांनी माझा शोध घेतला. मी १४ किंवा १५ वर्षाची असताना हा मेसेज लिहिला होता. त्यावेळी माझ्या बेडरुमची सजावट करण्यात येत होती आणि मी टाइम ट्रॅव्हलबद्दल विचार करत असताना हा मेसेज मी भिंतीवर लिहिला. एलीन ४ वर्षाची असताना भाऊ-बहिण आणि आई-वडिलांसोबत याठिकाणी राहायला आली. १८ वर्षाची झाल्यानंतर यूनिवर्सिटीत शिकण्यासाठी ब्राइटनला गेली. त्यानंतर ती लहानपणीच्या घरी पुन्हा कधीच परतली नाही. आता या मेसेजमुळे एलीनला तिच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.