कोरोना काळात अनेक आश्चर्यजनक घटना दररोज समोर येत आहेत. त्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना तर कित्येक लोक पुन्हा जिवंत झाले आहे. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. येथील एका ७५ वर्षीय महिलेने आपल्या परिवाराला तेव्हा आश्चर्य धक्का दिला जेव्हा ती कोरोनाला मात देऊन घरी परतली. झालं असं की, कृष्णा जिल्ह्यात राहणारी मुत्याला गिरिजम्माला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं होतं आणि चुकीचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला होता. परिवाराने त्यावर अंत्यसंस्कारही केला होता.
India.com च्या एका रिपोर्टनुसार, कृष्णा जिल्ह्यातील क्रिश्चियनपेट भागात राहणारी मुत्याला गिरिजम्मा नावाच्या महिलेले कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर तिला १२ मे रोजी विजयवाडा येथील सकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. महिलेला भरतील केल्यावर पती गदय्या घरी परत आले. जेव्हा त्यांनी १५ मे रोजी पत्नीची तब्येत जाणून घेण्यासाठी ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले तर पत्नी गिरिजम्मा आपल्या बेडवर नव्हती. आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, कदाचित त्यांना दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं असेल. (हे पण वाचा : Coronavirus: सुनेचा बदला घेण्यासाठी कोरोनाबाधित सासूनं मारली मिठी; रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन्...)
हॉस्पिटलमध्ये सर्व वार्डांमध्ये चौकशी केल्यावर आणि शोधाशोध केल्यावरही मुत्याला गिरिजम्मा यांचा काही पत्ता लागला नाही. यानंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी शवागृहात त्यांचा शोध घेण्यास सांगितलं. यानंतर ते शवागृहात गेले तर त्यांना तिथे त्यांच्या पत्नीसारखी दिसणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी डेथ सर्टिफिकेटही जारी केलं. यानंतर कुटुंबीय महिलेला मृतदेह आपल्या मूळ गावी घेऊन गेले आणि तिथे त्याच दिवशी अंत्यसंस्कारही केले.
गिरिजम्मा यांचा मुगला रमेशचा २३ मे रोजी कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता आणि परिवारातील लोकांनी त्यांच्यावरही अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांनी गिरिजम्मा आणि रमेश दोघांसाठीही एका प्रार्थना सभेचं देखील आयोजन केलं होतं. (हे पण वाचा : पोलिसांचा असाही एक चेहरा! बेघर वृद्ध महिलेला पोलिसाने स्वतःच्या हाताने घातले खाऊ)
महिला जिवंत परतली...
घरातील लोकांनी गिरिजम्माला मृत समजलं होतं. त्यामुळे कुणीही हॉस्पिटलमध्ये गेलं आणि कुणीही फार चौकशी केली नाही. दुसरीकडे गिरिजम्मा हा विचार करत होत्या की, त्यांना घेण्यासाठी घरून कुणीच कसं आलं नाही. यानंतर बुधवारी १ जूनला त्या स्वत: घरी परतल्या. गिरिजम्मा यांना घराच्या दारात पाहून घरातील सगळेच हैराण झाले. त्यांना बघून घरातील लोक आनंदी झाले.