कोमसच्या पेरू येथे राहणाऱ्या एका कुटुंबाला कुत्रे पाळण्याची खूप आवड होती. यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी कुत्र्याचे पिल्लू विकत घेतले होते. जेव्हा कुत्र्याचे पिल्लू थोडे मोठे झाले, तेव्हा त्याचं वागणं अतिशय धोकादायक बनलं. या कुत्र्याच्या पिल्लाने आसपासच्या अनेक कोंबड्या आणि लहान प्राणी मारले होते. यानंतर कुटुंबीयांनी वनविभागाला माहिती दिली. पुढे जे सत्य सोमर आले ते समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेरूच्या कोमसमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने सेंट्रल लिमा येथील एका छोट्या दुकानातून हस्की जातीचे गोंडस पिल्लू विकत घेतले होते. त्यांनी या पिल्लासाठी $13 दिले. त्यांनी या कुत्र्याला त्यांच्या घरी नेऊन 'रन-रन' असे नाव दिले. कुटुंब त्या कुत्र्याची खूप प्रेमाने काळजी घेत होते. जेव्हा हा कुत्रा थोडा मोठा झाला, तेव्हा कुटुंबाचा प्रमुख असलेल्या मारिबेल सोटेलो याच्याकडे शेजारच्या लोकांकडून तक्रारी येऊ लागल्या.
शेजाऱ्यांनी मारिबेल सोटेलो यांच्याकडे तक्रार केली की त्यांचा पाळीव कुत्रा शेजारच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसला आणि कोंबड्यांना पकडून मारले. लोकांनी सांगितले की त्यांचा पाळीव कुत्रा कोणत्याही प्राण्याला पाहून मारण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याने जवळपासचे अनेक पाळीव ससे, बदके आणि मांजरांनाही लक्ष्य केले होते.
मारिबेलला जेव्हा कुत्र्याबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्यावर त्यांनी वनविभागाला फोन करून बोलावले. वनविभागाचे लोक मारिबेलच्या घरी आले. वनविभागाने जे काही सांगितलं ते ऐकून मारिबेलच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. वनविभागाच्या लोकांनी सांगितलं की ज्याला ते इतका दिवस कुत्रा म्हणून सांभाळत आहेत, तो प्रत्यक्षात कोल्हा आहे.
मारिबेलनं सांगितलं की त्यांनाही त्यांचा हा कुत्रा आसपासच्या इतर कुत्र्यांपेक्षा वेगळा वाटत असे. त्यांचा कुत्रा जास्तच इतर प्राणी समोर दिसताच त्यांच्या मागे लागत असे. मारिबेलनं सांगितलं की त्यांच्या मुलाला प्राणी पाळण्याचा छंद आहे. म्हणून त्यांनी हा कुत्रा पाळला होता. मारिबेल यांनी सांगितलं, की या कुत्र्याला जेव्हा घरी आणलं तेव्हा तो भरपूर जखमी होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला इतर कुत्र्यांसोबत खेळण्यासाठी सोडण्यात आलं. मात्र, कोल्हा मोठा होताच त्यानं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. तो शेजाऱ्यांच्या घरी असलेल्या पाळीव प्राण्य़ांवर तसंच पक्षांवर हल्ला करून त्यांना मारू लागला.