हेल्मेटवरून गेल्याकाही वर्षांपासून देशात चांगलाच वाद-विवाद सुरू आहे. सुरक्षाकवच म्हणून हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. पण काही लोक तो वापरतात तर काही 'खतरों के खिलाडी' बनतात. असो, पण गेल्या काही दिवसांपासून एका कुटूंबाचे फोटो व्हायरल होत आहेत. या कुटूंबातील सगळेच लोक घरात हेल्मेट घालून वावरतात. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारं हे कुटुंब घरातील सर्वच कामे हेल्मेट लावूनच करतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं का?
ही घटना आहे २०१७ मधील जेव्हा सोशल मीडियात या कुटूंबाचे हेल्मेट घातलेले फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. याबाबत आता हे समोर आलं आहे की, हे कुटुंब त्यांच्या बाळासाठी दिवसभर घरात हेल्मेट लावून ठेवतात.
हे कुटुंब गॅरी गुटरेजचं आहे. त्यांना एक चार महिन्यांचा मुलगा असून तो 'प्लेजिओसेफ्ली' नावाच्या आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे बाळाच्या मेंदूचा आकार सामान्यापेक्षा अधिक होतो.
गॅरीने बाळावर उपचार केले तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की, बाळाला सतत हेल्मेट घालून ठेवा. जेणेकरून त्याच्या डोक्याच्या आकारात सुधारणा होईल. पण हा लहानगा म्हणजे जोंस हेल्मेटमुळे सतत वैतागलेला असायचा. अशात आपल्या बाळाची अडचण लक्षात घेऊन परिवारातील सर्वांनीच हेल्मेट घालण्याचा निर्णय घेतला.
गॅरीला याची जाणीव झाली की, जर घरातील सगळे सदस्य जोंसप्रमाणे हेल्मेट घालून राहतील तर त्याला सगळे एकसाखरे वाटतील. त्यानंतर गॅरी आणि त्याच्या परिवाराने घरात हेल्मेट वापरण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत त्यांचं बाळ पूर्णपणे ठिक होत नाही तोपर्यंत ते हेल्मेट वापरणार आहेत.