Bebe Rexha Injured: अमेरिकन गायिका आणि गीतकार बॅलेटा रेक्सा (बीबी रेक्सा) हिच्या बाबतीत रविवारी एक विचित्र घटना घडली. तिच्या एका लाइव्ह शो दरम्यान, तिच्यासोबत वेगळाच अपघात घडला. न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान तिच्या एका चाहत्याने तिच्यावर मोबाईल फेकला, ज्यानंतर ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया नक्की काय घडला प्रकार...
33 वर्षीय रेक्सा सध्या उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. ती पिअर 17 येथील रूफटॉप स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक एका चाहत्याने तिच्यावर मोबाईल फेकल्याने ती जखमी झाली आणि तिच्या चेहऱ्यावर तीन टाके पडले. रेक्सा जखमी झाल्याने तिने कॉन्सर्ट अर्धवट सोडली. तिला तिचा शो वेळेआधीच संपवावा लागला. तिच्या चाहत्यांचा झटपट निरोप घेत ती हॉस्पिटलला रवाना झाली. कॉन्सर्टनंतर भेट आणि अभिवादन सत्र आयोजित केले जाणार होते, परंतु तेदेखील रद्द करण्यात आले.
मोबाईचा प्रकार नक्की कसा घडला?
यानंतर पॉप बेसने ट्विटमध्ये सांगितले की, सिंगरच्या आईने सांगितले की, कोणीतरी प्रेक्षकांमधून सिंगरच्या दिशेने फोन फेकला, ज्यानंतर ती जखमी झाली.तिच्या चेहऱ्यावर तीन टाके पडले. या घटनेबद्दल ट्विटरवर चिंता व्यक्त करत गायकाच्या चाहत्यांनी हल्लेखोराला फटकारले. 'लोक असे का वागतात? त्यांना घरी योग्य वेळी चांगली शिकवण मिळत नाही का?' अशा पद्धतीचा सूर आता उमटू लागला आहे.
दरम्यान या घटनेचा भविष्यातील दौऱ्यावर काय परिणाम होईल हे सध्या सिंगरच्या टीमने सांगितलेले नाही. दौऱ्याच्या वेळापत्रकातही कोणताही बदल झालेला नाही. रेक्सा हिच्यावरील हल्ल्याआधीही अनेक असा घटना घडल्या आहेत.