जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लकी ड्रा च्या माध्यमातून गिफ्ट दिले जातात. लोकांना यात इंटरेस्टही खूप असतो. भारतातही वेगवेगळे लकी ड्रा सुरू असतात. लकी ड्रा संबंधी एक घटना झारखंडच्या भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे डिसेंबर 2023 मध्ये एक शेतकरी नीरज कुमार सिंह याने झारखंडमधील गोड्डाच्या हनवारा येथील नायरा पेट्रोल पंपावर 210 रूपयांचं पेट्रोल बाइकमध्ये भरलं होतं. पेट्रोल पंपावर त्यावेळी ग्राहकांकडून लकी ड्रा चे कूपन भरून घेतले जात होते. अशात नीरज कुमार यानेही कूपन भरलं आणि घरी निघून गेला.
नीरजने सांगितलं की, मार्च महिन्यात त्याला फोन आला होता की, मला लकी ड्रा मध्ये कार लागली आहे. तेव्हा त्याला हा फेक कॉल वाटला होता. पण जेव्हा त्याला पेट्रोल पंपावर येऊन कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याला विश्वास बसला नाही की, त्याला ह्युंदईची नवीन कार मिळाली आहे.
नीरज म्हणाला की, एका शेतकऱ्याला कार मिळणं ही एक मोठी बाब आहे. तो फार आनंदी आहे. पेट्रोल पंपाचे मालक सुधांशु गोयल सुद्धा कारची चावी नीरजला देताना फार आनंदी होते.
ते म्हणाले की, पूर्ण भारतात कार कंपनी लकी ड्रा च्या माध्यमातून ग्राहकांना गिफ्ट देते आणि हनवाराचं पेट्रोल पंप इतकं लकी आहे की, दोन वर्षात दोनदा या पेट्रोल पंपावरील ग्राहकांना कार गिफ्ट मिळाली.
ते पुढे म्हणाले की, छत्तीसगढ, बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि झारखंडच्या गोड्डाचं हनवारा पेट्रोल पंप एकुलतं एक असं पेट्रोल पंप ज्याच्या ग्राहकांनी कार जिंकली.
कार विजेता नीरज कुमार सिंह याला विचारण्यात आलं की, तू तर बिहारचा आहेस आणि झारखंडमध्ये पेट्रोल भरलं व कारही जिंकली कसं वाटत आहे? तेव्हा त्याने सांगितलं की, झारखंडमध्ये बिहारच्या तुलनेत पेट्रोल स्वस्त मिळतं. त्यामुळे जेव्हाही झारखंडला येतो तेव्हा पेट्रोल इथेच भरतो.