भाज्यांचे भाव जरा कुठे वाढले की सामान्य माणसांना टेंशन येतं. त्यामुळे भाज्या विकत घेण्याचं प्रमाणही कमी होतं. अनेकदा भाज्याचे भाव १०० ते २०० रूपये किलोपर्यंत पोहोचतात तेव्हा लोक भाज्या घेणचं बंद करून टाकतात. जर समजा उद्या १ लाख रूपये किलोंनी भाजी विकत असेल तर तुमची रिएक्शन काय असेल? लोक हमखास भाज्यांना दुसरे पर्याय शोधू लागतील. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण बिहारच्या एका शेतकऱ्यानं अशी भाजी पिकवली आहे. ज्याची किंमत १ लाख रूपये किलो आहे.
ही भाजी विकत घेण्याआधी जगभरातील कोणताही श्रीमंत व्यक्ती नक्की विचार करेल. या भाजीचं नाव हॉप-शूट्स (hop-shoots) आहे. या भाजीचा वापर खासकरून बीयरमध्ये फ्लेवरिंगसााठी केला जातो. हर्बल मेडिसिन्स आणि भाज्यांच्या स्वरूपातही याचा वापर होतो. असं मानलं जातं की, या भाजीतील एसिड माणसाच्या शरीरातील कॅन्सर सेल्सना मारण्यात प्रभावी भूमिका निभावतात.
या गुणधर्मामुळे ही भाजी (World's most expensive vegetable) सगळ्यात महाग विकली जाते. या महागड्या भाजीची शेती करत असलेल्या तरूणाचे नाव अमरेश सिंह असून तो बिहारच्या औरंगाबादचा रहिवासी आहे. हॉप शूट्सच्या फुलांना हॉप कॉन्स असे म्हणतात. या फूलांचा वापर बियर बनवण्यासाठी केला जातो. तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत
सोशल मीडियावर सुप्रिया साहू यांनी हा फोटो शेअर केला असून आतापर्यंत २२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी हे फोटो रिट्विट केले आहेत. सुप्रिया यांच्यामते भारतीयांसाठी या भाजीची शेती गेमचेंजर ठरू शकते. टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....