बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:06 PM2020-08-10T15:06:15+5:302020-08-10T15:14:22+5:30
इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले.
अनेकदा सरकारच्या नाकाखाली अशा गोष्टी घडत असतात ज्यांची त्यांना कानोकान खबर नसते. बैतूल-भोपाळ नॅशनल हायवेवरील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले.
रिपोर्ट्सनुसार, एनएचएआय द्वारे बैतूल ते भोपाळ हायवेचं काम सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून डिव्हायडरवर सोयाबीनची रोपे वाढलेली पाहून तहसीलदारही हैराण झाले. चौकशी केल्यावर जी माहिती समोर आली त्याने ते हैराण झाले. माहिती समोर आी की, हायवेवरील डिव्हायडरवर १० फूट रूंद आणि ३०० फूट लांब जागेवर लल्ला यादव नावाच्या व्यक्तीने सोयाबीन पेरलं.
लल्ला यादवने सांगितले की, एका कंपनीला रस्त्यावरील डिव्हायडरवर झाडे लावायची होती. पण बरेच दिवस झाले तरी झाडे लावली गेली नाही. जागा रिकामी होती. याचा फायदा घेत त्याने ५ किलो सोयाबीन तिथे पेरलं. थोड्या दिवसांनी जेव्हा तिथे पेरलेलं पिक चांगलं उगवलं तर तो त्याची काळजी घेऊ लागला. या शेतकऱ्याने असेही सांगितले की, त्याच्याकडे ५ किलो बियाणं शिल्लक होतं. त्यामुळे ते त्याने डिव्हायडरवर पेरलं. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा :
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!
शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल