लॉकडाऊननंतर अनेक सुरक्षित तरूण कमाईचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या गावी आले. कोणी लहानसा बिझनेस टाकला तर कोणी शेतीच्या कामातून उत्पन्न घ्यायला सुरूवात केली. उच्च शिक्षण असतानाही नोकरी न करता शेतीमध्ये मन रमवून उत्पन्न घेत असलेल्या तीन मित्रांची गोष्ट समोर आली आहे. शेती विधेयकाला विरोध सुरू असतानाही महाराजगंज जिल्ह्यातील तीन तरुण मित्र शेतीतील प्रगतीचे एक अनोखं उदाहरण ठरले आहेत. एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.
भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी दुर्गेश सिंग हा एमबीए पदवीधर आहे. दुर्गेश त्याचे दोन मित्र वरुण सिंग आणि आदित्य शाही यांच्यासह गेल्या एका वर्षापासून पारंपारिक शेतीऐवजी अधुनिक पद्धतीने पाच एकर शेतात फळे आणि भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करीत आहेत. फलोत्पादन विभागाचे तांत्रिक सहाय्य आणि अनुदानावर पुरवणार्या कृषी यंत्रणेच्या मदतीने दुधी, काकडी आणि हंगामी भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली.
यासाठी शासनाच्या मदतीने शेतीत नवीन तंत्रज्ञान अवलंबले गेले. पहिल्या हंगामात पारंपारिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न सात पट वाढले. पाच एकर क्षेत्रात फळ आणि भाजीपाल्यांच्या सेंद्रिय शेतीमुळे २ डझनपेक्षा जास्त लोकांना रोजगारा मिळाला आणि दहा लाख रुपयांचा नफा झाला. आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, ''गेल्या 6 महिन्यांत भाज्या व फळांचे उत्पादन सुरू झाले. एकूण किंमत दीड लाख रुपयांचा खर्च यासाठी आला. विक्रीतून 12 लाख रुपये मिळाले. यामुळे उत्साह वाढला आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या आशा वाढल्या. सध्या या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.
जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे आदर्श म्हणून उदयास आलेल्या आदित्य प्रताप सिंह, दुर्गेश सिंग, वरुण शाही यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीत चांगला वापर केला. त्यांच्या पदवीने देखील यात मदत केली. वरुण शाही (वय 35) हे बी कॉम पास आहेत, आदित्य सिंह विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत, दुर्गेश सिंग यांनी एमबीए केले आहेत.
वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला
या तिघांनीही आपल्या जिद्दीने व मेहनतीने सहा महिन्यांत चांगले परिणाम दाखवले आणि इतर शेतकर्यांनाही सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केले. वरुण शाही शेतीचे काम पाहतात, आदित्य सिंह पेरणीपासून काढणीपर्यंत वैज्ञानिक पध्दतीचा उपयोग करतात. एमबीए पदवी धारक दुर्गेश फळे आणि भाज्यांचे विपणन आणि व्यवस्थापन करतात.
अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ
या तीघांचे सेंद्रिय शेतीचे काम सुरळीत सुरू असताना पिकांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा धोका होता. त्याचवेळी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला बिझनेस कनेक्ट केला आणि त्यांचे फळं, भाज्या ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली. बनारस, जौनपूर, अलाहाबादचे व्यापारी वाजवी दराने विक्रीसाठी उपलब्ध सेंद्रिय पिके पाहून घाऊक खरेदीसाठी पुढे आले. यानंतर, सेंद्रिय पद्धतीने महाराजगंजमधून पिकलेली फळे आणि भाज्या महानगरांपर्यंत पोहोचू लागल्या.