शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

संसदेत नेत्याने केला 'धमाकेदार' कारनामा, नाक दाबून बाहेर पळण्याची सदस्यांवर आली वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:51 PM

वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ झाल्यावर संसद किंवा विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

(Image Credit : technology.inquirer.net) (प्रातिनिधीक फोटो)

वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ झाल्यावर संसद किंवा विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण केनियातील संसद सभागृहात असं काही झालं की, ज्यामुळे सगळेच हैराण झाले. सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आल्याचं हे अशाप्रकारचं पहिलंच कारण असेल. गेल्या बुधवारी येथील होमा बे काउंटी संसदेतील सभागृहात एका सदस्याने सोडलेल्या गॅसची दुर्गंधी अशी काही पसरली होती की, थेट सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं.  

सभागृहात एका मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद सुरू होता. अचानक दुर्गंधी येऊ लागली. लगेच सर्व सदस्य नाक दाबून पेपरने हवा घेऊ लागले. पण दुर्गंधी इतकी जास्त होती की, तिथे बसणे कठीण झाले होते. मजेशीर बाब म्हणजे यादरम्यान सभागृहातील सदस्यांनी गॅस सोडण्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले. ज्यूलिअल गाया नावाचे एक सदस्य सभापतींना म्हणाले की, आपल्यापैकी एका सदस्याने सभागृहातील हवा प्रदूषित केली आहे.

त्यानंतर सभापती एडविन काकाछ यांनी चक्क १० मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहातील सदस्य बाहेर पळाले. सोबतच सभापतींनी तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना सांगितले की, इथे चांगलं रूम फ्रेशनर मारा. ते असंही म्हणाले की, व्हॅनिला असो वा स्ट्रॉबेरी कोणतही फ्लेवर असो, लगेच मारा. नंतर काही वेळाने दुर्गंधी कमी झाल्यावर सगळेच सदस्य आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि सभागृहाचं कामकाज सुरू झालं. 

टॅग्स :kenyaकेनियाJara hatkeजरा हटके