(Image Credit : timesofindia.indiatimes.com)
ज्या धमाकेदार स्पर्धेची गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चा रंगली होती ती 'पाद स्पर्धा' अखेर पार पडली. रविवारी सूरतमध्ये ही स्पर्धा झाली. मंच सजलेला होता, परिक्षकही बसलेले होते, मीडियाचंही लक्ष लागलेलं होतं आणि स्पर्धकांच्या पोटात गुडगुड सुरू होती. पण ऐन वेळेला स्पर्धकांची हवा टाइट झाल्याने ही स्पर्धा फुसका बार ठरली.
भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच स्पर्धा शांततापूर्वक पार पडली. कारण जशी अपेक्षा केली गेली तशी आतशबाजी काही कुणाला इथे ऐकायला मिळाली नाही. मीडिया रिसोर्ट्सनुसार, या स्पर्धेसाठी २०० लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र, ऐनवेळी स्पर्धेसाठी केवळ ३ लोक हजर झाले. मग काय आयोजकांनी विचार केला की, या तिघांनाही मेडल दिलं जावं.
पहिला पुरस्कार विष्णु हेडा यांनी देण्यात आला. सामान्यपणे असं होतं की, पादल्यानंतर व्यक्ती थेट 'मी काहीच केलं नाही' असं म्हणत दुसऱ्याकडे बोट दाखवतात. इथे तर अडीच हजाराचं बक्षिस घेतल्यावरही विष्णु हेडा म्हणाले 'मी काहीच केलं नाही'. दुसरे स्पर्धक सुशील जैन अनोशा पोटी आले खरे पण माइकसमोर उभे पाहताच ते नर्व्हस झाले. त्यांना तीन प्रयत्नांनंतरही यश मिळालं नाही.
रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांना देखील स्पर्धेत भाग घेण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. पण लाजेमुळे कुणीच समोर आले नाही. सर्धेत भाग घेण्यासाठी महिलांनी देखील रजिस्ट्रेशन केलं होतं. पण कुणीच समोर आलं नाही.
असो, मुळात ही एक नैसर्गिक प्रक्रिया असूनही याकडे चुकीच्या पद्घतीने पाहिलं जातं. पादण्याचा संबंध दुर्गंधीशीच जोडला जातो. तेव्हा म्हटलं जातं, उत्तमम दधददात पादम, मध्यम पादम थुचुक थुचुक, घनिष्ठः थुड़थुडी पादम, सुरसुरी प्राण घातकम - चतुर