आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक फॅशन स्टेटमेंट बघितले असतील. काही स्टाइल तुम्हाला फार सुंदर वाटतात तर काही बघून तुम्ही थक्क होता. अनेक टॉप ब्रॅन्डही फॅशनच्या नावावर काहीही करतात आणि त्यांची खिल्ली उडवली जाते. यूकेतील एक फॅशन डिझायनर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एक फॅशन स्टुडंट महारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने ट्रेनमधील सीट कव्हरपासून तयार केलेले क्रॉप टॉप घातलं आहे. या टॉपवर लिहिलेल्या मेसेजची जास्त चर्चा होत आहे.
सीट कव्हरचा बनवला क्रॉप टॉप
अमेरिकन फॅशन डिझायनरने तयार केलेल्या या क्रॉप टॉपची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ही चर्चा यासाठी होत आहे कारण हा टॉप तिने ट्रेनमधील सीट कव्हर चोरी करून तयार केलाय. आणि खास बाब म्हणजे हा टॉप बोल्डही आहे. मात्र, या टॉपमुळे ती अडचणीतही सापडली आहे. या महिलेचं नाव Mhari Thurston असं आहे.
फारच बोल्ड आहे टॉप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत एक महिलाने फोर बोल्ड क्रॉप टॉप घातला आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या महिलेने हा टॉप महिलेने यूकेतील चीलटार्न ट्रेनमधून चोरी केला होता. महारीने सांगितले की, या टॉपची आयडिया तिला लोकांना कोरोनाबाबत अवेअर करण्यासाठी आली. या टॉपच्या माध्यमातून तिला कोरोनाबाबत अवेअरनेस करायचं आहे. या टॉपवर सोशल डिस्टंसिंगचा मेसेज लिहिला आहे.
महारीने सांगितले की, जेव्हा ती प्रवासासाठी ट्रेनमध्ये चढली. तिची नजर सीटवरील या कव्हरवर गेली. तेव्हा तिला क्रॉप टॉपची आयडिया सुचली. हे कव्हर घरी नेऊन तिने क्रॉप टॉप तयार केला आणि तो घालून सोशल मीडियावर फोटो शेअर केले. हे फोटो लगेच व्हायरल झालेत.
वाढल्या अडचणी
महारीने हा टॉप सेल करण्यासाठी एका ऑनलाइन वेबसाइटवरही ठेवला आहे. पण याने तिची अडचण वाढली आहे. टॉपचे फोटो व्हायरल झाले आणि यूके रेल्वेची त्यावर नजर पडली. त्यांनी तिच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. तर अडचणी वाढत असल्याचे पाहत महारीने पोस्ट डिलीट केली. आता या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.