काही लोकांना त्यांचे नशीब अपेक्षेपेक्षा जास्त देते. असाच प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. या कुटुंबाला नशीबाने साथ दिली आणि रात्रीत कुटुंब कोट्यधीश झालं. कुटुंबातील तीन सदस्यांनी फक्त 82-82 रुपये गुंतवून 41-41 लाख रुपये कमावले. या तिघांनी एकाच दारूच्या दुकानातून लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. तिघांनाही लॉटरी लागली आणि ते तिघे कोट्यधीश झाले.
एकाच दुकानातून लॉटरी घेतलीलॉटरी जिंकल्यानंतर तिघांना एकाच दिवशी 41-41 लाख रुपये मिळाले. म्हणजेच 1.23 कोटी रुपये घरात आले. हे प्रकरण अमेरिकेतील मेरीलँड येथील आहे. आधी 61 वर्षांच्या वडिलांनी 82 रुपयांना ($1) लॉटरीचे तिकीट खरेदी केले. 13 ऑक्टोबर रोजी त्यांनी कॅरोल काउंटीमधील हॅम्पस्टेड दारूच्या दुकानातून हे तिकीट खरेदी केले.
तिघांनी एकच नंबर घेतला वडिलांनंतर 28 वर्षीय मुलीनेही याच दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. यानंतर 31 वर्षीय दुसऱ्या मुलानेही तिकीट काढले. विशेष म्हणजे, या तिघांनीही वेगवेगळ्या वेळी जाऊन 5-3-8-3-4 हा एकच अंक निवडला. 13 ऑक्टोबर रोजी लॉटरीचा निकाल लागला आणि या तिघांनी 41-41 लाख रुपये ($50,000) जिंकले.
एका व्यक्तीने दोनवेळा 6 कोटी जिंकलेलॉटरी जिंकण्याचे विचित्र किस्से जगभरातून येत असतात. अलीकडेच, एका व्यक्तीने 13 महिन्यांच्या अंतराने लॉटरीमधून सुमारे 6-6 कोटी रुपये जिंकले होते. कॅनडाचा रहिवासी असलेला अँटोनी बेनीने ऑगस्ट 2021 मध्ये 6 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने दुसऱ्यांदा लॉटरी जिंकली आहे.