एक महिला तब्बल 17 वर्षांनंतर आपल्या खऱ्या आई-वडिलांना भेटली. तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियावर तिला एक फोटो दिसला होता. जो तिच्या वडिलांनी पोस्ट केला होता. महिलेचं नाव झोंग जिनरोंग आहे. ती चीनची राहणारी आहे. या कामासाठी तिच्या वडिलांना एका आर्टिस्टची मदत घेतली. महिलेच्या वडिलांनी मुलीच्या बालपणीच्या आठवणी आर्टिस्टला सांगितल्या. ज्याद्वारे त्याला ती मोठी झल्यावर कशी दिसेल हे समजण्यास मदत मिळाली. 2006 साली झोंग किडनॅप झाली होती.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, झोंग हिला एका कपलला विकण्यात आलं होतं. ती त्यांच्यासोबत जात होती, ते ठिकाण त्या रस्त्यापासून 300 किलोमीटर दूर होतं जिथून ती बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी नोकरी सोडली आणि देशभरात तिला शोधण्यासाठी निघाले. त्यांच्यावर बरंच कर्जही झालं होतं.त्यां
चं म्हणणं आहे की, 'एक वडील म्हणून माझ्याकडे एकच उपाय होता की, मी माझ्या मुलीचा शोध सुरूच ठेवावा'. त्यांच्या घरात पत्नीसोबत इतर दोन मुलेही राहतात. ते 17 वर्ष आपल्या हरवलेल्या मुलीला शोधत होते.
2018 साली झोंगच्या वडिलांची भेट प्रसिद्ध आर्टिस्ट लिन युहुई यांच्यासोबत झाली. त्यांनी त्यांची मदत घेतली. त्यांनी सांगितलं की, टीनेजर म्हणून त्यांची मुलगी कशी दिसत असेल, तिचं एक स्केच बनवा. मग ते हेच स्केच घेऊन मुलीच्या शोधासाठी निघाले.
यानंतर सप्टेंबर महिन्यात झोंगने स्थानिक सोशल मीडियावर Douyin वर आपल्या वडिलांचे व्हिडीओ पाहिले. तिला आधीच हे माहीत होतं की, ती ज्यांच्यासोबत आता राहत आहे त्यांनी तिला विकत घेतलं आहे. ती एक प्रवासी मजूर म्हणून काम करत होती. मग तिला स्केच आणि तिच्यात काही साम्य दिसलं. दोघांची नंतर डीएनए टेस्ट झाली. त्यातून हे स्पष्ट झालं की, ते महिलेचे वडील आहेत.
झोंगच्या वडिलांनी सोशल मीडियावर सांगितलं की, माझी मुलगी सापडली आहे. इतकी वर्ष माझ्या परिवाराबाबत काळजी करण्यासाठी आणि मदतीसाठी लोकांचे धन्यवाद. त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगाही आहे. ती 2 नोव्हेंबरला आपल्या आई-वडिलांना भेटली.
या घटनेची सध्या चीनमध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे. लोकांनी यावेळी मानवी तस्करांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. लोक म्हणाले की, महिला नशीबवान आहे की, तिला तिचे वडील सोशल मीडियावर सापडले. लोकांनी परिवाराला शुभेच्छा दिल्या.