शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

३०० किलो वजन, ३० सिगरेट, ४ लिटर कोल्डड्रिंक! असं होतं 'या' व्यक्तीचं थक्क करणारं डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 8:46 AM

ब्रिटनच्या सर्वात वजनदार माणसाचे नाव जेसन हॉल्टन आहे, तो 32 वर्षांचा आहे. एकदा मेडिकल इमर्जन्सी असताना त्याला क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढावं लागलं होतं.

सुस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपलं वजन वाढतं. वजन वाढणं आणि कमी होणं हे खाण्याच्या सवयीवर अवलंबून असतं, त्यामुळे प्रत्येकानं आपल्या खाण्याच्या सवयी बरोबर ठेवाव्यात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणसाची स्थिती इतकी बिघडते की काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो आणि अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

काही काळापूर्वी, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीचं वजन सुमारे 320 किलो पर्यंत पहोचलं होते. त्याचे वजन इतकं वाढलं होतं की त्याला मेडिकल इमर्जन्सीसाठी खिडकी तोडून क्रेनच्या माध्यमातून रुग्णालयात पोहोचवावं लागलं होतं. त्यानं द सन ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यानं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सांगितलं.

कोण आहे ही व्यक्ती?ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणि युकेमधील सर्वात वजन असलेल्या या व्यक्तीचं नाव जेसन होल्टन आहे. त्याचं वय 32 वर्षे आहे. त्याचं वजन 320 किलो होतं. परंतु त्यानं आता आपलं काही प्रमाणात कमी केल्याचं म्हटलं जात आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे प्राण वाचल्याचंही सांगण्यात आलंय. एकदा मेडिकल इमर्जन्सीदरम्यान त्याला त्वरित रुग्णालयात नेण्याची गरज भासली. परंतु त्यावेळी त्याचं वजन इतकं होतं की त्याला रुग्णालयात नेण्यासाठी 30 फायरमेन आणि इंजिनिअर्सच्या टीमनं क्रेनच्या सहाय्यानं सात तासांत रुग्णालयात पोहोचवलं.

सिगरेट, कोल्डड्रिंक सोडलंद सननुसार त्याचं वजन आता 298 किलो आहे. त्याला ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याची सवय लागली होती. जेव्हा वाटायचं तेव्हा तो ऑनलाइन फूड मागवायचा. यामुळे त्याचं वजन इतकं वाढलं आणि 320 किलोंपर्यंत पोहोचलं. जेसन एकदा एका रात्रीत 3 ते 4 लिटर कोल्डड्रिंक प्यायला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यानं ब्रिटनच्या मेडिकल इमर्जन्सी नंबरवर फोन केला आणि टीम त्याच्या बचावासाठी पोहोचले. वजन वाढल्यामुळे शरीराराला त्रास होत आणि रक्ताच्या गाठी बनत असल्याचंही त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्याला यासाठी औषध देण्यात आलं आणि नंतर किडनी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या शरीरात मशीननं पाणी सोडण्यात आलं.

असं होतं डाएटसुरूवातीला लंचमध्ये तीन मोठे चिकन नूडल्स, झिंगा क्रॅकर्स, झिंगा टोस्ट तो खात असे. त्यानंतर रात्रीच्या खाण्यात पनीर सँडव्हिच, दोन चॉकलेट बार, क्रिस्पचे तीन पॅकेट्स, दीड लिटर संत्र्याच्या ज्युस आणि पाच सॉफ्टड्रिंकचे कॅन घ्यायचा. याशिवाय दिवसाला किमान 30 सिगरेट्स तो ओढत होता.

“सध्या मला चोवीस तासात केवळ दीड लिटर लिक्विड दिलं जातं. खाण्यासाठी काहीही दिलं जात नाही. मला खुप तहान लागते. जर मला काही प्यायला दिलं नाही तर मी पोलिसांना फोन करेन की डिहायड्रेट झाल्यानंतरही मला काही प्यायला दिलं जात नाही. मी बेडवरून उठूही शकत नाही आणि कुठे जाऊदेखील शकत नाही. मला आजारी असल्याचं वाटत आहे. पहिले मी दिवसाला तीन ते चार लिटर कोल्डड्रिंक पित होतो. परंतु आता मला केवळ 100-100 मिली. लिक्विड दिलं जातं,” असं जेसननं मुलाखतीदरम्यान सांगितलं.

टॅग्स :Englandइंग्लंड