गेल्यावर्षी २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याची सुरूवात झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ज्या चीनमधून या महामारीला सुरूवात झाली होती त्या चीनमधील तरूण आता इतके घाबरले आहेत की, ते मृत्यूच्या भीतीने आताच त्यांचं मृत्यूपत्र तयार करत आहेत.
चायना रजिस्ट्रेशन सेंटरच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे मृत्यूच्या भीतीने जास्तीत जास्त तरूण आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत. एका रिपोर्टचा हवाला देत साउथ चायना मॉर्निंग पोस्टने सांगितले की जास्तीत जास्त चीनी नागरिक आधीपेक्षा जास्त इच्छाशक्तीसोबत आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत.
रिपोर्टनुसार, २०१९ ते २०२० पर्यंत १९९० नंतर जन्माला आलेल्या अशा तरूणांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत ६० टक्के वाढ झाली आहे. जे तरूण आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत. गेल्या ऑगस्टपासून आतापर्यत मृत्यूपत्र तयार करण्यासाठी संबंधित केंद्रावर येणाऱ्या कॉलची संख्या तिप्पट वाढली आहे. चीनी लोक आपलं घर आणि संपत्तीच्या व्यवस्थेसाठी सल्ले घेत आहेत.
एका लेखात किन चेन यांनी लिहिले की, मृत्युबाबत चर्चा होत असल्याने समाजात याबाबत अधिक भीती निर्माण झाली आहे. सिन्हुआने सोमवारी एक वृत्त दिलं होतं की, एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने ज्याचं नाव शियाओहोंग आहे. तो त्याच्या २० हजार युआनच्या संपत्तीचं मृत्युपत्र तयार करण्यासाठी शांघायच्या एका सेंटरमध्ये पोहोचला होता.
त्याने सांगितले होते की, त्याने त्याची संपत्ती त्याच्या एका मित्राच्या नावावर करण्याचा निर्णय घेतलाय. या मित्राने त्याला कठिण काळात मदत केली होती. रिपोर्टनुसार, ८० टक्के तरूण त्यांचं सेविंग दुसऱ्याला देण्याची इच्छाशक्ती ठेवत आहेत. चीनी कायद्यानुसार, १८ वर्षापेक्षा अधिक वयाची कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकतात. तर १६ वर्षांनंतर कुणीही स्वतंत्रपणे कमाई करू शकतात.