विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या कुर्नल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनं तिच्या १३ वर्षीय मुलाचं लग्न एका २३ वर्षीय तरुणीशी लावलं. या सोहळ्याला नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते. एप्रिलमध्ये कुर्नूल जिल्ह्यातील उप्पाराहल गावात विवाह सोहळा संपन्न झाला. ही घटना आता उघडकीस आली आहे.
१३ वर्षांची आई तिच्या पतीच्या दारूच्या सवयीमुळे वैतागली होती. ती सतत आजारी असते. त्यामुळे आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी तिला एखाद्या प्रौढ व्यक्तीची गरज होती. तेव्हा तिची भेट एका तरुणीच्या आई वडिलांशी बंगळुरूमध्ये झाली. तिथेच मुलाच्या आईनं तिच्या अल्पवयीन मुलाचा विवाह निश्चित केला.स्टंट दाखवताना साप चावला; रागाच्या भरात 'सनी देओल'नं सापाचा फणाच गिळला, अन् मग...
कुर्नूलमधील गावात दोघांचा विवाह संपन्न झाला. या लग्नाला दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची जिल्हा प्रशासनानं दखल घेतली. पोलीस गावात दाखल झाले. त्यांनी नवदाम्पत्याचं घर गाठलं. मात्र तिथे नवदाम्पत्य आढळून आलं नाही.
या प्रकरणाची बालकल्याण अधिकारी आणि स्थानिक तहसीलदारांनी दखल घेत चौकशी सुरू केली. मुलाचे आई वडील शेतात मजुरी करत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. मुलीचे पालकदेखील शेजारच्या कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात मोलमजुरी करतात. लग्न झालेला १३ वर्षांचा मुलगा त्याच्या कुटुंबातील भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याला एक लहान भाऊ आणि दोन लहान बहिणी आहेत.