भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना आपल्या कुटुंबीयांपासून दूरही केल्याचं आपण पाहिलं आहे. दररोज आपल्याला अशा कोणत्या ना कोणत्या घटना ऐकायला मिळतात. या काळात काही चांगल्याही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. अशातच दिल्लीतून सर्वांच्या मनात घर करून जाणारी एक माहिती समोर आली आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका दांपत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांचं एक सहा महिन्यांचं बाळही होतं. परंतु त्या बाळाची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. अशा परिस्थितीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुढाकार घेत त्या बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत राहणाऱ्या या दांपत्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. परंतु त्या बाळाचा अहवाला नकारात्मक आला. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार त्यांनी यानंतर दिल्ली पोलिसांना फोन केला आणि मदती करण्याची विनंती केली. दिल्लीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपले नातेवाईक येऊ शकत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांना आपल्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये याची चिंता होती. शाहदरा जिल्ह्यात तैनात असलेलय्या महिला हेड कॉन्स्टेबल राखी यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्या दांपत्याशी संपर्क केला आणि बाळाला आपल्यासोबत घेऊन आल्या. पोलीस कर्मचारी राखी यांनी बाळाचे कपडे, खाणं आणि अन्य आवश्यक वस्तू आपल्यासोबत घेतल्या. तसंच त्यांनी त्या बाळाची काळजीही घेतली. त्यांनी त्या बाळाला अगदी आईप्रमाणे खाऊ-पिऊही दिलं. त्यानंतर त्या बाळाला सुरक्षितपणे आजीआजोबांकडे मोदीनगर या ठिकाणी पोहोचवलं. या संपूर्ण प्रवासात राखी यांनी त्या बाळाची अगदी आईप्रमाणे काळजी घेतली. या महिला पोलीस कर्मचाऱ्याला एक सलाम.
माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:48 PM
Coronavirus : बाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत.
ठळक मुद्देबाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण.महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत.