नेहमीच महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना समोर येत असतात. पण महिलाही काही अत्याचारांच्या घटनांमध्ये सहभागी असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत असं काही केलं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.
ही घटना इतकी अजब आहे की, तुम्ही वाचून हैराण व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला जो माफीच्या लायकही नाही. ही घटना पंजाबच्या जालंधरची आहे. इथे एका 13 वर्षाच्या मुलासोबत एका महिला शिक्षिकेने जबरदस्ती लग्न केलं.मीडिया रिपोर्टनुसार, महिला व्यवसायाने टीचर आहे. तिने तिच्या स्टुडंटसोबतच हा कारनामा केला. यामागे एक अंधविश्वास सांगितला जात आहे. जालंधरच्या बस्ती बावा खेळ परिसरात एका महिला टीचरने तिच्या लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एका अल्पवयीन मुलासोबत लग्न केलं. सांगितलं जात आहे की, आरोपी महिलेला मंगळ आहे. तिचं लग्न जुळत नव्हतं. तिला वाटलं की, असं केल्याने तिचा दोष टळेल. पीडित स्टुडंटने महिला टीचर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
कसं फसवलं स्टुडंटला
असं सांगितलं जात आहे की, आरोपी महिला टीचन गावातील शाळेत शिकवत होती. तिने त्या स्टुडंटला ट्यूशनचं लालसा देऊन त्याला घरी बोलवलं. त्यानंतर तिने स्टुडंटला बंदी बनवलं आणि 6 दिवस जाऊ दिलं नाही. यादरम्यान मंगळ दोष दूर करण्यासाठी तिने त्याच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं.
गरिबीचा घेतला फायदा
पीडित स्टुडंट एका गरिब परिवारातील आहे. त्याच्या आई-वडिलांकडे इतके पैसे नव्हते की, त्याला ट्यूशन लावू शकतील. आरोपी टीचरने मोफत ट्यूशन घेण्याचं त्याला आमिष दिलं. त्याच्या परिवाराने परवानगीही दिली. ती त्याला तिच्या घरी घेऊन गेली. त्यांनीही परवानगी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाला घरात ठेवून टीचरने त्याच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं. त्यानंतर मेहंदीपासून ते हळदीचे सगळे रिवाज करण्यात आले. इतकंच नाही तर मधुचंद्राचंही नाटक करण्यात आलं.
लग्नानंतर झाली विधवा
हैराण करणारी बाब बी आहे की, इतक्यावरच महिलेचं नाटक थांबलं नाही. लग्न झाल्यावर सहा दिवसांनी ती विधवा झाली. यासाठी तिने स्वत: हातातील बांगड्या फोडल्या. त्यानंतर पतीच्या निधनाचा संदेश सगळ्या नातेवाईकांना दिला आणि शोकसभाही ठेवली. पांढरी साडी नेसून तिने शोक व्यक्त केला. आरोपी महिला टीचरने स्टुडंटला घरी पाठवलं. घरी जाऊन त्याने परिवाराला सगळं काही सांगितलं. त्यानंतर त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.