साप म्हटलं की अनेकांचा थरकाप उडतो, त्यात सापांच्या विविध अशा प्रजाती आहेत ज्या निसर्गाच्या सानिध्यात उघडपणे फिरत असले तरी अनेकांच्या नजरेला दिसून येत नाहीत. जर तुम्हाला चॅलेंज स्वीकारायचं असेल तर या फोटोला निरखून पाहा आणि १५ सेकंदात साप कुठे लपलाय शोधून दाखवा. या फोटोत एक साप आहे, जो झाडांच्या सुकलेल्या पानांमध्ये आहे. अनेक लोकांनी प्रयत्न करुन पाहिले, पण १५ सेकंदात त्यांना हा साप शोधता आला नाही.
या फोटोतील साप सोधण्यासाठी तीक्ष्ण आणि एकाग्र नजरेची गरज आहे. तुम्हीही हा फोटो पाहा या फोटोतील साप तुम्हाला दिसून येईल.
या फोटोला ट्विटर युजर्स @dm_ynwa ने शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन लिहिली आहे की, १५ सेकंदात साप शोधा, अनेक युजर्सने प्रयत्न करुनही त्यांना साप दिसला नाही. अनेकांनी कमेंटमध्ये याचं उत्तर दिलं आहे, मग तुम्हाला दिसला का साप? कारण १५ सेकंद झाले की..
हा बघा साप
जर तुम्ही सापाला शोधलं असेल तर कमाल आहात. म्हणजे छुप्या वस्तू शोधण्यात तुम्ही माहीर आहात. तुमची नजर चित्यापेक्षा कमी नाही. कमेंटमध्ये जाऊन उत्तर शोधण्यापेक्षा फोटो निरखून पाहा.