लग्नातील भांडणाच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा भांडणाबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्हीही थक्क व्हाल. यूपीच्या एका जिल्ह्यातून लग्नानंतरच्या एका भांडणाची अजब घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाला नवरीची ईच्छा पूर्ण न करणं चांगलंच महागात पडलं.
लग्नाची पहिली रात्र प्रत्येक नवरी-नवरदेवासाठी खास असते. दोघांसाठीही हा नवीन अनुभव असतो. पण एका नव्या जोडप्यासाठी ही पहिली रात्रच संसाराची शेवटची रात्र ठरणार होती. घटना जरा अजिबच आहे. पण नवरदेवाला आपल्या नवरीला मनवण्यासाठी चांगलाच घाम फुटला होता.
डिलारी गावात राहणाऱ्या एका तरूणाचं आठवडाभराआधी जवळच्याच गावातील एका तरूणीसोबत लग्न झालं होतं. लग्नात दोन्हीकडील लोकांनी भरपूर पैसा खर्च केला होता. पण दोघांमध्ये वाद तेव्हा झाला जेव्हा नवरदेव लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीजवळ पोहोचला.
असं सांगण्यात आलं की, इथे पत्नी पतीकडे मुंह दिखाईसाठी वीस हजार रूपये इतकी रक्कम मागितली होती. तेच नवरदेवाने तिला केवळ 7 हजार रूपये दिले. जे घेण्यास नवरीने नकार दिला. मग काय, लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांमध्ये वाद झाला.
त्यानंतर काही रिवाजांसाठी नवरी माहेरी गेली. घरी आल्यावर नवरीने याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितलं. तिने सासरी परत जाण्यास नकार दिला. त्यानंतर याची माहिती तरूणीच्या पतीला देण्यात आली. नवी नवरी नाराज झाल्याने सासरचे लोक चिंतेत पडले.
दोन्हीकडील लोकांनी आणि नवरदेवाने नवरीला खूप समजावण्याचा शक्य तो प्रयत्न केला. पण नवरी अडून राहिली. काही होत नसल्याचं बघून मग पंचायत बोलवण्यात आली. तेव्हा कुठे हा वाद मिटवण्यात आला आणि नवरी आपल्या सासरी जाण्यासाठी तयार झाली.