जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा तिला सांगण्यात आलं की, तिच्या स्वप्नातील राजकुमार इंजिनिअर आहे. लग्नही मोठं शानदार करण्यात आलं. लग्नानंतर ती सासरी आली. पण काही दिवसांतच असं काही झालं की, न्यायासाठी तिला एसपीकडे जावं लागलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील आहे.
येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं. लग्न हिंदू रितीरिवाजानुसार पार पडलं होतं. यात तरूणीच्या वडिलांनी भरपूर खर्च केला आणि हुंडाही दिला होता. पण त्यांना याचा जराही अंदाज नव्हता की, मुलीसोबत असं काही घडेल.
तरूणी लग्न करून जेव्हा सासरी पोहोचली तेव्हा सुहागरातच्या दिवशी शुभम त्रिपाठी काहीतरी कारण सांगत बाहेर गेला. यानंतरही काही दिवस तो असंच बाहेर जात होता. काही दिवसांनी तरूणीला पतीवर संशय आला. नंतर पती शुभम त्रिपाठीने तिला सांगितलं की, तो किन्नर आह. जे ऐकून तिला धक्का बसला. पती किन्नर असल्याचं समजल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली.
तरूणीने सांगितलं की, तिचा पती किन्नर असल्याची माहिती जेव्हा तिने पतीच्या आईला सांगितलं की, तेव्हा सासूने तिचा मोठा मुलगा अभिषेकसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली होती. ज्याचा विरोध केल्यावर 23 मार्च 2023 ला तिला तिच्या रूममध्ये सासू मीना, पतीचा मोठा भाऊ अभिषेक, पती शुभम आणि नणंदेचा मुलगा आलोक यांनी तिला मारहाण केली. तसेच पतीच्या मोठ्या भावासोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागले.
तरूणीने तिच्यासोबत होत असलेला हा सगळा प्रकार आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला. तरूणीचे कुटुंबिय तिला घेण्यासाठी सासरी आले. तिला आपल्यासोबत घेऊन गेले. पण तरूणीच्या सासरच्या लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे दागिने आणि पैशांसोबत फोटो काढले. इतकंच नाही तर तरूणीचे वडील आणि भावावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकीही दिली. यानंतर तरूणीने एएसपी दुर्गेश कुमार सिंह यांना हा सगळा प्रकार सांगितला. एएसपी म्हणाले की, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.