जगात अनेक अशा गोष्टी घडतात ज्या पहिल्यांदा होतात. त्यातील सकारात्मक गोष्टींच नक्कीच कौतुक झालं पाहिजे. नेटकरीही ही गोष्ट मान्य करतात. म्हणूनच सध्या एका पहिल्यांदाच झालेल्या सर्जरीचं कौतुक सर्वांनकडून केलं जातंय. तब्बल २३ वर्षांनंतर या व्यक्तीवर ही सर्जरी करण्यात आली आहे. या सर्जरीमुळे अशा स्थीतीने पिडीत सर्व रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
जगात पहिल्यांदा एका व्यक्तीच्या हाताचं ट्रान्सप्लांट झालंय. तेही यशस्वीरित्या! ट्रान्सप्लांट झालेल्या व्यक्तिचं नाव फेलिक्स गेर्टरसन आहे. ते ४९ वर्षाचे आहेत. ते आईसलँड देशाचे रहिवासी आहेत. त्यांना एकाने हात दान केले. केवळ हातच नाही तर त्यासोबत त्याचे बायसेप्सही दान केले. १९९८ मध्ये ते वीजेची लाईन दुरुस्त करत होते तेव्हा त्यांना फार जोरात करंट लागला. त्यामध्ये त्यांचे हात पूर्णपणे जळले.
फिलिक्स ३ महिने कोमामध्ये होते. डॉक्टरांनी फिलिक्सचे दोन्ही हात काढुन टाकले. त्यासाठी डॉक्टरांना त्यांच्यावर ५४ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. फिलिक्स यांनी कोमातून बाहेर आल्यावर त्यांची हालत बघितली तेव्हा तेव्हा त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांना ट्रॉमाचा सामना करावा लागला.
सन २००७मध्ये फिलिप्स यांनी टीव्हीवर एक भाषण ऐकले त्यात आईसलँड युनिवर्सिटीचे प्राध्यापक डॉ. जेन मायकल डबर्नाड यांनी हाताच्या ट्रान्सप्लांटवर मार्गदर्शन केले. फिलिक्स यांनी संपर्क साधून डॉ. डबर्नाड यांना हात ट्रान्सप्लांट करण्याची विनंती केली.
४ वर्षांनंतर फिलिक्सची विनंती त्यांनी मान्य केली. त्यानंतर फिलिक्स यांनी पब्लिक फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवण्यास सुरुवात केली. या जानेवारीत त्यांच्यावरील आलेल्या प्रसंगाला २३ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता त्यांच्यावर १५ सर्जरी करून खांद्यासकट हात ट्रान्सप्लांट करण्यात आले. ते म्हणतात आता मी काही प्रमाणात हातांची हालचाल करू शकतो. हे सर्व नर्वस सिस्टिम योग्य पद्धतीने काम केल्याशिवाय होणे शक्य नाही. मार्चमध्ये त्यांना रिहॅबिशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. आता ते ठीक आहेत.