तुम्ही घरातील अक्वॅरियममध्ये गोल्डफिश (Goldfish) पाहिली असेल. सोनेरी रंगाचा छोटासा मासा त्या टँकमध्ये अतिशय सुंदर दिसतो. पण, हाच मासा 30 किलोचा झाला तर...एका ब्रिटिश मच्छीमाराने तब्बल 30 किलो वजनाची गोल्डफिश पकडली आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, या मच्छीमाराने पकडलेला मासा जगातील सर्वात मोठी गोल्डफिश आहे.
या महाकाय गोल्डफिशला 'द कॅरट' नाव देण्यात आले असून, याचे वजन 30 किलो आहे. ही गोल्डफिश 2019 मध्ये अमेरिकेच्या मिनिसोटामध्ये पकडलेल्या 13 किलो वजनाच्या गोल्डफिशपेक्षा दुप्पट मोठा आहे. आतापर्यंत या गोल्डफिशला जगातील सर्वात मोठी गोल्डफिश म्हणून ओळख मिळाली होती.
42 वर्षिय ब्रिटिश मच्छीमार अँडी हॅकेटने फ्रांसच्या ब्लूवॉटर तलावात हा मासा पकडला आहे. हॅकेट म्हणतात की, मला नेहमी वाटायचे, हा मासा तलावात आहे. पण, मीच या माशाला पकडेल, असा कधी विचारही केला नव्हता. हॅकेटला हा मासा पकडण्यासाठी 25 मिनिटे लागली. सुरुवातीला माशाने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर तो हॅकेटच्या हातात आलाच.