नेहमीच समुद्रातून काहीना काही मूल्यवान वस्तू सापडल्याच्या घटना समोर येत असतात. कधी व्हेलची कोट्यावधी रूपयांची उलटी कुणाला सापडते तर कधी कोट्यावधी रूपयांचे मासे. आता थायलॅंडमधून एक घटना समोर आली आहे. इथे एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला इतकी मूल्यवान वस्तू सापडली ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. ३७ वर्षीय Hatchai Niyomdecha च्या हाती लागलेला मोती कोट्यावधी रूपयांचा आहे.
हा मोती त्यांना समुद्राच्या आत नाही तर समुद्र किनाऱ्यावरच सापडला. हा मोती एक शिंपल्यात होता. त्याने आधी भावाला बोलवलं आणि त्याला हे बघायला सांगितलं. त्यानंतर ते हे शिंपले घरी घेऊन गेले. त्यांनी ते वडिलांना दाखवले. त्यांच्या वडिलांनी जेव्हा शिंपल्याच्या आत पाहिलं तर ते हैराण झाले. यात त्यांना एक ऑरेंज मोती सापडला. ज्याची किंमत कोट्यावधी रूपये आहे. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')
Hatchai ने सांगितले की, 'एका वयोवृद्ध लांब मिशाच्या व्यक्तीने मला समुद्र किनाऱ्यावर बोलवलं होतं. जेणेकरून मी हे गिफ्ट कलेक्ट करू शकेन. मला वाटतं ती व्यक्तीच मला या मोत्यापर्यंत घेऊन आली'.
त्याने सांगितले की, ते हा मोती जास्तीत जास्त किंमतीला विकण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं नशीब बदलेल. सध्या त्यांचं चीनच्या एका व्यापाऱ्याशी बोलणं झालं आहे. त्यांना अपेक्षा आहे की, या मोत्याला १० मिलियन थाई बात इतकी किंमत मिळावी. भारतीय करन्सीनुसार ही किंमत २ कोटी रूपयांपेक्षा अधिक होते.