Women body found inside the stomach of a shark: सोशल मीडिया अनेक लोक त्यांच्यासोबत घडलेल्या अजब अजब घटनांबाबत पोस्ट शेअर करत असतात. अशाच एका पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. या पोस्टमध्ये एका धक्कादायक घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. काही दिवसांआधी मासे पकडणाऱ्या काही मच्छिमारांच्या जाळ्यात एक शार्क अडकली. जी आजारी वाटत होती. मच्छिमारांना वाटलं की, प्लास्टिक किंवा जाळ्याशिवाय समुद्रात फेकलेला कचरा शार्कच्या आजाराचं कारण असेल. मात्र, जेव्हा मच्छिमारांनी शार्कच्या पोटाला थोडं फाडून पाहिलं तर त्यांना धक्का बसला.
असं सांगण्यात आलं आहे की, मदत करण्याच्या प्रयत्नात जेव्हा मच्छिमारांनी जेव्हा शार्कच्या पोटाला चीरा मारला जेव्हा आत त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसला. हैराण करणारी ही घटना इंडोनेशियातील असल्याचं सांगण्यात येत आहे. असं सांगण्यात आलं की, महिलेने स्काय डायविंग करण्यासाठी वापरले जाणारे कपडे घातले होते. अशात मच्छिमारांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. तर पोलिसांना एक महिला बेपत्ता असल्याची सूचना मिळाली.
प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, ही महिला काही आठवड्यांआधी बेपत्ता झाली होती. तिच्या परिवाराने तिच्या शोधासाठी अनेकदा रिपोर्ट दाखल केले होते. पण काहीच हाती लागलं नाही. आता या घटनेने वेगळंच वळण घेतलं आहे.
पोलिसांनी शार्कच्या स्थितीचा अभ्यास करत सांगितलं की, शार्कने महिलेला गिळलं असेल, तिच्या मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी हे फायदेशीर ठरेल. एक्सपर्ट म्हणाले की, समुद्री जीवांच्या जीवनशैली आणि त्यांच्या आहारात अशा गोष्टी काही नवीन नाही. मात्र, मानवी शरीर अशाप्रकारे मिळणं हे फारच दुर्मीळ आहे.
हैराण करणारी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चौकशीतून समोर आलं की, ६८ वर्षीय अमेरिकन कोलीन मोनफोर अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. ती समुद्रात तिच्या सहा मित्र-मैत्रिणींसोबत डायविंग करण्यासाठी गेली होती. यादरम्यान पाण्याच्या फोर्समुळे ती अचानक बेपत्ता झाली. पोलिसांनुसार, महिलेचे कपडे आणि तिच्या अवशेषांवरून तिची ओळख पटवण्यात आली. असं सांगण्यात आलं की, महिला बेपत्ता झाल्यानंतर ८ दिवसांनी तिचा मृतदेह सापडला.