शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

'पाच वर्ष स्वर्गात...!' क्लिनिकली डेड झाली होती महिला, सांगितलं 'मृत्यू'नंतर काय काय पाहिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 5:50 PM

ही घटना 6 मे, 2001 ची आहे. तेव्हा सकाळच्या सुमारास क्रॅमर बाथरूमकडे जात होत्या. तेव्हाच अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता.

एका महिलेने स्वर्गासंदर्भात मोठा दावा केला आहे. आपण तेथे गेलो होतो आणि पाच वर्ष राहूनही आलो, असे या महिलेने म्हटले आहे. मात्र, तिने केलेल्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे सांगितले जाऊ शकत नाही. द मिररच्या वृत्तानुसार, लिंडा क्रॅमर नावाची ही महिला 14 मिनिटांहूनही अधिक काळ क्लिनिकली डेड होती. तिचे म्हणणे आहे की, तिने माउंट एव्हरेस्टहूनही 30,000 पट मोठी पर्वत रांग पाहिली. क्रॅमरने मरणोत्तर जीवनाशी संबंधित अनुभव शेअर केले आहेत. वृत्तानुसार, ही घटना 6 मे, 2001 ची आहे. तेव्हा सकाळच्या सुमारास क्रॅमर बाथरूमकडे जात होत्या. तेव्हाच अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता. क्रॅमर यांचे म्हणणे आहे की त्यांचा प्रवास येथेच थांबला नव्हता. जेव्हा डॉक्टर त्यांना वाचवत होते, तेव्हा त्या स्वर्गात गेल्या होत्या. दुसऱ्यांदा श्वास आल्यानंतर क्रॅमर यांनी हे अनुभव सांगितले आहेत. त्या म्हणाल्या, आपण जेवढ्यावेळ स्वर्गात होतो, तो वेळ आपल्याला पाच वर्षं एवढा दीर्घ वाटला. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्रॅमर यांनी दावा केला, की त्या हवेत होत्या, तेव्हा डॉक्टर त्यांच्यावर ट्रिटमेंट करत होते. यानंतर त्यांनी मृत्यूनंतरचे जीवन पाहिले.

अनेक पटिंनी मोठा पर्वत पाहिल्याचा दावा - यासंदर्भात बोलताना क्रॅमर यांनी भूतलावर नाहीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, 'मी एका फुलांनी व्यापलेल्या भागात उभी आहे, असे मला दिसले. मी माउंट एव्हरेस्टपेक्षाही 30,000 पट मोठी असलेली परवत रांग पाहत होते. मी जेथे होते, त्यामागे एक मोठी पर्वत श्रृंखला होती. मी गगनचुंबी इमारती पाहू शकत होते. मी तलाव पाहिले, मला सुंदर दृश्ये पाहता आली.' यातच, न्यूरोसायंटिफिक रिसर्च मधून समजते की, एनडीई (निअर डेथ एक्सपेरिअन्स) एक अशी घटना आहे, जी 'शारीरिक मल्टीसेन्सरी इंटीग्रेशन'मधील समस्येमुळे निर्माण होते. महत्वाचे म्हणजे, जेव्हा एखाद्या कारणामुळे आपला जीव धोक्यात असेल, तेव्हा असे होते.

अशा स्थितीत लोक विविध प्रकारच्या अनुभवासंदर्भात माहिती देत, काही सकारात्मक आणि काही नकारात्मक गोष्टी सांगतात. एनडीईदरम्यान सर्वसाधारणपणे लोक मृत्यू पावलेले नातलग, धार्मिक व्यक्ती आणि शरीराबाहेर आत्म्याच्या स्वरुपात मिळालेले अनुभव सांगतात.

 

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूdoctorडॉक्टर