फाइव्ह स्टार हॉटेल म्हटलं की हे बेस्टच असेल असं वाटतं. त्यामुळे बरेच लोक डोळे झाकून या हॉटेलवर विश्वास ठेवतात. भले जास्त पैसे द्यावे लागत असतील पण किमान तिथं स्वच्छता राखली जाते, सुरक्षित अन्नपदार्थ खायला मिळतात आणि उत्तम सेवाही मिळते, असा दिलासा असतो. त्यामुळे काही लोक तर फाइव्ह स्टार हॉटेलशिवाय दुसऱ्या कोणत्या हॉटेलमध्ये खाणंपिणं करतच नाही. पण अशाच एका फाइव्ह स्टार हॉटेलचं डर्टी सिक्रेटचा उलगडा झाला आहे .
ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जायला आवडतं किवा तिथं जाण्याचं स्वप्न तुम्ही पाहात आहात. त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात काय आणि कसं शिजतं हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? यूकेतील अशाच एका प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
समुद्रकिनारी असलेलं यूकेतील ब्लॅकपूलमधील नॉर्थ शोर हॉटेल (North Shore Hotel). गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फूड स्टँडर्ड एजन्सी या हॉटेलबाबत बऱ्याच तक्रारी आल्या. त्यामुळे या हॉटेलवर एजन्सीने अचानक छापा मारला. त्यानंतर जे दिसलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. Lanc Live च्या रिपोर्टनुसार या हॉटेलचं किचन अतिशय अस्वच्छ होतं. इतर स्वच्छताही राखली जात नव्हती.
इथं अशा अनेक वस्तू होत्या ज्या एक्सपायर झाल्या होत्या. त्यापासूनच खराब पदार्थ साठवून त्यापासून खाद्यपदार्थ बनवले जात होते. सॉसच्या बाटल्या खराब झाल्या होत्या. किचनमध्ये गरम पाण्याची व्यवस्था नव्हती. याचा अर्थ कर्मचारी आपले हात थंड पाण्यानेच धुवून काम करत होते.
तपासानंतर हे हॉटेल लगेच सील करण्यात आलं आहे. आता हे हॉटेल बंद आहे. इतक्या मोठ्या हॉटेलचा असा हलगर्जीपणा पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. भले हे प्रकरण यूकेतील असेल. तरी आपण ज्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो तिथंही अशी परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहा आणि काळजी घ्या.