फ्लाइटमध्ये जेव्हा प्रवासादरम्यान जर कुणाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या डेडबॉडीसोबत काय होतं. याबाबत व्हर्जिन ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइट अटेंडंट (Flight Attendant) ब्रेना यंगने (Brena Young) आपला अनुभव शेअर केला. ब्रेनाने सविस्तरपणे सांगितलं की, विमान प्रवासादरम्यान डेडबॉडीचं काय केलं जातं?
डेडबॉडीची सीट सीक्यूर करतात
'द सन'च्या वृत्तानुसार, ब्रेनाने एका पॉडकॉस्टमध्ये सांगितलं की, हे सर्व स्टाफ गरजेचं असतं की, प्रवासादरम्यान कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना सन्मान देणं सर्वात महत्वाचं असतं. तिने सांगितलं की, ते आधी मृत प्रवाशाची सीट सिक्युर करतात. जेणेकरून जेव्हा एअरक्राफ्ट जमिनीवर लॅंड होईल तेव्हा क्राइम सीनमध्ये काही बदल होऊ नये आणि मृत्यूची योग्य चौकशी करता यावी.
याचा अर्थ हा होतो की, पूर्ण एअरक्राफ्ट आणि त्यात बसलेले प्रवासी पोलीस चौकशीत सहभागी असतात. जोपर्यंत पोलिसांची घटनास्थळाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवासी एअरक्राफ्टमधेच असतात आणि त्यांना बराच वेळ वाट बघावी लागते.
दरवर्षी हजारो डेडबॉडीसोबत प्रवास करतात लोक
दरवर्षी हजारो डेडबॉडीज आकाशात प्रवास करत असतात आणि कुणालाही त्यावेळी याबाबत माहीत नसतं. याबाबत कोणत्याही प्रवाशाला काहीच सांगितलं जात नाही. त्या डेडबॉडीला एक नाव दिलं जातं. डेडबॉडीला एचआर म्हटलं जातं. ज्याचा अर्थ ह्यूमन रिमेंस होतो.
अशा स्थितीत काय करतात?
डेडबॉडी तशीच सीटवर ठेवली जाते. पण जेव्हा एखादा प्रवासी त्याच बाजूच्या सीटवर बसलेला असतो तेव्हा स्थिती अजब होते. असाच एक किस्सा तुर्कीहून रशिया प्रवासादरम्यान झाला होता.
एका ५० वर्षीय डायबिटीस पेशंट महिलेचा प्रवास सुरू केल्यावर ४५ मिनिटांनीच मृत्यू झाला होता. कारण तिच्याकडे त्यावेळी इन्सुलिन नव्हतं. हा प्रवास साडे तीन तासांचा होता. अशात तिच्या बॉडीला एका ब्लॅंकेटने झाकलं होतं. पण तिच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांसाठी हा भयावह अनुभव ठरला होता.