शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 5:55 PM

Flight emergency landing: एका प्रवाशाने वैमानिकाला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण तो परत आलाच नाही.

Flight emergency landing:विमान प्रवासाचा आनंद प्रत्येकालाच घ्यायचा असतो, पण विमान प्रवासातील एक छोटीशी चूक कोणाच्याही जीवावर बेतू शकते. हवेत उडणाऱ्या इझीजेट विमानाच्या बाबतीतही असेच घडले. या विमानाचे एडिनबर्ग विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, यामागचे कारण कोणतीही गडबड नसून वैमानिकाची प्रकृती खालावली होती.

नेमकं काय झालं?इझीजेट फ्लाइट क्रमांक EZY6938 ने रविवारी सकाळी हेराक्लिओन, ग्रीस येथून स्कॉटिश राजधानीसाठी उड्डाण केले. पण उड्डाणाच्या मध्येच असे काही घडले की विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. 'डेलीस्टार'च्या वृत्तानुसार, अचानक विमानातून इमर्जन्सी लँडिंगचा संदेश आल्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच अलर्ट जारी करण्यात आला. एवढेच नाही तर या घोषणेनंतर विमानातील प्रवासीही घाबरले होते.

आजारी पायलट टॉयलेटमध्ये अडकलाएडिनबर्ग विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तत्पूर्वी विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, त्याने फ्लाइटच्या पायलटला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण बाहेर येताना दिसला नाही. त्यावेळेस एका तरुण वैमानिकाकडून विमान चालवले जात होते. त्यानेच कॅप्टनच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इमर्जन्सी लँडिंगची माहिती दिली.

विमान कंपनीने एक निवेदन जारी केलेप्रवाशाने सांगितले की, विमानात वैमानिक सुमारे 13 तास ड्युटीवर असल्याची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. तो टॉयलेटला गेला आणि तिथे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. ते बाहेरही पडू शकले नाही. विमानाने सुरुवातीला 45 मिनिटे उशिराने उड्डाण केले होते. आले. याबाबत विमान कंपनीनेही निवेदन जारी करत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सairplaneविमान