मेघालयाच्या सौंदर्याबाबत अनेक जण जाणून आहेत. पण, येथील बोटीतून होणारा प्रवास त्याहीपेक्षा वेगळा अनुभव देणारा आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात नद्या एवढ्या स्वच्छ आहेत की, बोटीतून जाताना अगदी तळाचा भागही स्पष्ट दिसतो.यापैकीच एक नदी आहे उमंगोट. दावकी शहरानजीकच्या या नदीतून बोटीतून जाताना चक्क उडण्याचा अनुभव घेता येतो. कारण, स्वच्छ पाण्यावर ही बोट दुरुन पाहिले तर उडत असल्याचे दिसते. शिलाँग शहरापासून ८५ किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे.
उडणारीबोट ! बोटीतून प्रवास करताना चक्क उडण्याचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 3:28 AM