Pregnancy Tourism : प्रत्येक कपलला वाटत असतं की, त्यांचं होणारं बाळ निरोगी, फीट, सुंदर आणि रंग-रूपाने चांगलं असावं. पण बाळाचं रंग-रूप कसं असेल हे तर आई-वडिलांवर अवलंबून असतं. तरीही आजकाल लोक होणाऱ्या बाळांचं रंग-रूप सुधारण्यासाठी असं काही करतात जे ऐकायला फार अजब वाटतं.
प्रेग्नेंसी टूरिज्म (Pregnancy Tourism)ही अशीच एक अजब कॉन्सेप्ट आहे. ज्याचा भारतातील एका भागाशी संबंध आहे. भारतातील या भागातील गाव परदेशी महिलांमध्ये फार फेमस आहे. इथे या महिला प्रेग्नेंट होण्यासाठी येतात. आम्ही हेही स्पष्ट करतो की, आजच्या काळात याला केवळ कल्पना आणि अफवा मानलं जातं. पण वेळोवेळी काही लोक याबाबत बोलत असतात.
अल जजीरा, ब्राउन हिस्ट्री आणि कर्ली टेल्सच्या रिपोर्टनुसार, लडाखची राजधानी लेहपासून साधारण 160 किलोमीटर अंतरावर बियामा, डाह, हानू, गारकोन, दारचिक नावाची काही गावे आहेत. जिथे साधारण 5 हजार लोक राहतात. हा एक खास समाज आहे जो लडाखच्या या भागांमध्ये राहतो. या जमातीचं नाव ब्रोकपा (Brokpa community) आहे. ब्रोकपा लोकांचा दावा आहे की, ते जगातील शेवटचे शिल्लक राहिलेले सगळ्या शुद्ध आर्य (Pure Aryans) आहेत. म्हणजे त्यांचं रक्त आर्यांचं आहे. आधी आर्य इंडो-इराणी वंशाच्या लोकांना म्हटलं जात होतं. पण नंतर इंडो यूरोपियन मूळाच्या लोकांना म्हटलं जाऊ लागतं.
वेगळे असतात हे लोक
असं मानलं जातं की, हे लोक महान सिंकदरच्या सेनेत सैनिक असायचे. जेव्हा सिकंदर भारतात आला तेव्हा त्याच्या सेनेतील काही सैनिक सिंधु घाटीत राहिले. त्यांना मास्टर रेस नावानेही ओळखलं जातं. लडाखच्या इतर लोकांप्रमाणेच यांची बनावटही वेगळी असते. हे मंगोलियन आणि तिबेटी लोकांसारखे दिसत नाहीत. हे उंच असतात, रंग गोरा असतो, केस लांब असतात, जबडे मोठे असतात आणि डोळ्यांचा रंग हलका असतो.
इथे येतात यूरोपिअन महिला
हैराण करणारी बाब ही आहे की, आतापर्यंत याचा काही पुरावा मिळाला नाही की, या जमातीतील लोक शुद्ध आर्य आहेत. त्यांची ना डीएनए टेस्ट झाली ना कोणती इतर टेस्ट. तरी सुद्धा जर्मनीसहीत यूरोपच्या इतर देशातील महिला इथे येत असतात. त्या इथे याच कारणाने येतात जेणेकरून त्यांना शुद्ध आर्य बीज मिळालं. जेणेकरून त्यांच्या बाळांचं रंग-रूप त्या लोकांसारखं व्हावं. याच कारणाने याला प्रेग्नेंसी टूरिज्मचं नाव देण्यात आलं आहे. 2007 सालात Achtung Baby: In Search of Purity नावाची एक डॉक्यूमेंट्री रिलीज झाली होती. जी संजीव सिवन यानी तयार केली होती. या डॉक्यूमेंट्रीत एका जर्मन महिलेने हे कबूल केलं होतं की, ती शुद्ध आर्य बीज’च्या लालसेने लडाखला आली आहे.