Girl Lost Money : जसजसा टेक्नॉलॉजीचा जमाना वाढत आहे, तसतशी फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अनेकदा फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून फसवलं जातं. अशात लोक आपलं नुकसान करून बसतात. एका केस स्टडीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की, कशाप्रकारे एका तरूणीने तिच्या खात्यातून 30 लाख रूपये गमावले होते. तिची चूक इतकीच होती की, तिने डोळेझाकपणे हॅकरवर विश्वास ठेवला.
ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकताच या घटनेचा समावेश एका केस स्टडीमध्ये करण्यात आला आहे. या घटनेत एका तरूणीचं फार मोठं नुकसान झालं होतं. झालं असं की, तरूणीच्या मोबाइलवर एक मेसेज आला आणि या मेसेज काही गोष्टी लिहिल्या होत्या. तरूणीला वाटलं की, हा मेसेज बॅंकेकडून आला आहे. कारण त्या मेसेजमध्ये तरूणीचा मोबाइल नंबर होता. त्यानंतर एक फोन आला.
तरूणीला ज्या व्यक्तीने फोन केला होता ती व्यक्ती एखाद्या बॅंकरसारखी बोलत होती. त्यामुळे तरूणीच्या काही लक्षात आलं नाही. तिने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. तो तरूणीला म्हणाला की, बॅंक खात्यात काहीतरी समस्या आहे आणि हॅकर्स काही खात्यांसोबत छेडछाड केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात टाकावे लागतील.
तरूणीला वाटलं तो खरं बोलतोय. मग त्याने जी काही माहिती मागितली ती तरूणीने त्याला दिली. तिच्या खात्यातील 30 लाख रूपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. तरूणीला वाटलं हे केवळ तिच्याच सोबत नाही तर इतरांसोबतही होत आहे. कारण तिला आलेल्या मेसेजमध्ये तिच्या नंबरसोबतच इतरही लोकांचे नंबर होते. तरूणीला काहीच समजलं नाही की, तिच्यासोबत काय झालं. जेव्हा तिने तिचं खातं चेक केलं तर तिच्या खात्यातून 30 लाख रूपये गायब झाले होते.
ही घटना ऑस्ट्रेलियातील जरी असली तरी भारतात सुद्धा अशा घटना घडतात. त्यामुळे बॅंकेसंबंधी कोणताही व्यवहार करण्याआधी खातरजमा करून घ्यावी. नाही तर तुमच्या खात्यातीलही पैसे गायब व्हायला वेळ लागणार नाही.