मैत्रिणीचं लग्न कोणत्याही मुलीसाठी नेहमीच खास असतं. कोणतीही मुलगी यानिमित्ताने नटण्याची संधी गमावत नाही. वधूची अपेक्षा असते की वधूसारखेच कपडे आणि दागिने मैत्रिणींनी देखील परिधान करावेत. पण वधूने लग्नात सामील होण्यासाठी आपल्या खास मैत्रिणीसमोर एक अशी अट ठेवली की मैत्रीच तुटली.
महिलेने Reddit वर एका पोस्टद्वारे संपूर्ण घटना सांगितली. तिने सांगितलं की वधूने मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला लग्नापर्यंत बाळाचं प्लॅनिंग करू नये असं सांगितलं होतं कारण तिला लग्नाच्या वेळी तिची मैत्रीण कोणत्याही कारणाने आजारी पडू नये असं वाटत होतं. वधूच्या या बोलण्यामुळे मैत्रीण खूप दुःखी झाली आणि तिने सांगितले की आता तिला लग्नात वधूची मैत्रीण व्हायचं नाही. मैत्रिणीचं बोलणं ऐकून वधू संतापली आणि तिने रागाच्या भरात आपल्या मैत्रिणीला दिलेलं निमंत्रण रद्द केलं.
महिला म्हणाली की, मला वाटतं की तिच्या अपेक्षा थोड्या जास्त होत्या आणि तिने इतरांचाही विचार केला पाहिजे. या महिलेने सांगितले की, हे फक्त बाळाच्या प्लॅनिंगपुरतंच नव्हतं, तर तिच्या अशा मागण्या होत्या ज्या अवास्तव होत्या. अडचण अशी होती की, महिलेने मैत्रिणीच्या लग्नासाठी हॉटेलचं बुकिंग आणि येण्या-जाण्याची तिकिटं आधीच बुक केली होती, ज्याची किंमत £3,000 म्हणजेच 3 लाख रुपये होती आणि त्यानंतर तिचं आमंत्रण रद्द करण्यात आले.
महिलेने सांगितले की, तिला रिफंड मिळाला आहे पण तिची वधू मैत्रीण किती स्वार्थी आहे हे समजल्यावर आश्चर्य वाटलं. ती सर्वांना मी तिची छोटी बहीण असल्याचं सांगायची आणि आता या छोट्याशा गोष्टीवरून अतिशय टोकाचे मेसेज केले आहेत. तिने माझ्या नवऱ्याला जोकर आणि डिप्रेसिंग म्हटलं आहे. मी तिच्या एकाही मेसेजला रिप्लाय दिला नाही. तिने मला त्याच्या सर्व सोशल मीडियावरून अनफ्रेंड केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.