Viral News: ब्रिटनमधील केंब्रिजजवळ शास्त्रज्ञांना एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. येथील बार हिलवर रस्त्याच्या कडेला केलेल्या उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना 8,000 प्राचीन टॉड आणि बेडकांची हाडे सापडली आहेत. 2016-2018 दरम्यान लोहयुगात बांधलेल्या घराजवळ हे उत्खनन झाले. यादरम्यान 14 मीटर लांब आणि 6 फूट खोल खड्ड्यात ही हाडे सापडली. बेडकांच्या या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांना एक मीटर वरची माती आणि सबसॉईल खणून काढावी लागली. एकाच ठिकाणी इतके अवशेष सापडणे ही एक असामान्य आणि विलक्षण शोध आहे.
या घटनेमागे अनेक सिद्धांत जिथून हे अवशेष सापडले, तेथे जळलेल्या धान्याचे पुरावे मिळाले आहेत. यावरुन काही असे म्हणत आहेत की, त्या काळात लोक एकाच ठिकाणी पिक ठेवत असत. पिकांमुळे इतर कीटक तिथे आले असावेत आणि बेडूक त्यांना खायला आले असावेत. प्रागैतिहासिक काळातील बेडकांच्या या अवशेषामागे आणखी एक सिद्धांत दिला जातोय. तो म्हणजे, बेडूक प्रजनन करण्यासाठी या भागात आले असावेत आणि खड्ड्यात पडून अडकले असतील. कडाक्याच्या थंडीमुळे या बेडकांचा इथेच मृत्यू झाला असावा. बेडकांमध्ये काही रोग झाल्यामुळे असे घडले असावे असाही एक सिद्धांत आहे.