शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 1:01 PM

Knowledge : अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत.

Coconut Water : उन्हाळा आला किंवा कुणी आजारी किंवा कुणाला एनर्जी हवी असेल तर जास्तीत जास्त लोक नारळाचं गोड पाणी पितात. नारळ्याच्या पाण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण ते क्वचितच कुणाला माहीत असतात.  निसर्गाची करणी अन् नारळात पाणी, असा वाकप्रचार आपण सर्वांनीच ऐकलेला असतो.

कदाचित अनेकांना याबाबत कुतूहलही असतं की, नारळात पाणी येतं कसं? पण सगळेच विचार करून सोडून देतात. मात्र, हा खरंच अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे की, नारळात पाणी येतं कसं? अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत.

Quora.com वर काही लोकांनी माहिती दिली की, मुळात नारळात जे पाणी असतं त्याला नारळाच्या झाडाचं Endosperm असं म्हटलं जातं. हे पाणी मुळांमधून उलट्या दिशेने वर शोषलं जातं. जे भ्रूणाच्या म्हणजेच नारळाच्या Angiosperm मध्ये विकासा वेळी आणि Fertilasation नंतर इंडोस्पर्म Nucleus मध्ये रुपांतरित होतं. 

कच्च्या नारळात जे इंडोस्पर्म असतं ते Nuclear Type असतं. तसंच ते रंगहीन रूपात असतं. ज्यात अनेक nuclei तरंगत असतात. भ्रूण कोशात(नारळाच्या आत) हा तरल पदार्थ भरलेला असतो. यातच भ्रूणाचा विकास होतो.

नंतरच्या अवस्थेत अनेक Nuclei सेल्जसोबत मिळून नारळाच्या आतल्या बाजूला जमा होत जातं. नंतर याचा एक पांढरा जाड थर तयार होत जातो. हेच नंतर खोबरं म्हणून तयार होतं. यात Free Nuclei असल्याने हे फारच पोषक असतं. दुधापेक्षा अधिक प्रोटीन नारळात असतं. तसेच यात सर्वाधिक पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सुद्धा असतं.

अनेक झाडांप्रमाणे नारळाचं झाड पाणी संचय करून ठेवण्यासाठी आपल्या फळांचा वापर करतं. हे पाणी झाडाच्या मुळातून एकत्र केलं जातं. नंतर कोशिकांद्वारे फळात जातं. इतर फळांमधून हे पाणी काढण्यासाठी फळांना पिळलं जातं. जे रसाच्या रूपात वापरलं जातं. पण नारळात हे पाणी आत असतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके