Popcorn facts : पॉपकॉर्न ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. घरी टाइमपास म्हणून काही खायचो असो वा थिएटरमध्ये सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये लोक आवडीने पॉपकॉर्न खातात. पॉपकॉर्न जगभरात खाल्ले जातात. पण याचा शोध कधी लागला हे क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ तुमच्या आवडत्या पॉपकॉर्नचा काही रोचक गोष्टी...
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात सर्वातआधी अमेरिकेतील मूळ निवासी पॉपकॉर्न खात होते. नंतर तिथे राहणाऱ्या युरोपियन लोकांनी देखील पॉपकॉर्न खाण्यास सुरूवात केली होती.
जगात पहिल्यांदा पॉपकॉर्न भाजण्याची मशीन 135 वर्षांआधी म्हणजे 1885 मध्ये तयार करण्यात आली होती. अमेरिकेत राहणारे चार्ल्स क्रेटरने ही मशीन तयार केली होती. त्यावेळी ते शेंगदाणे भाजण्यासाठी एक मशीन तयार करत होते. मात्र, ती नंतर पॉपकॉर्न भाजणारी मशीन झाली.
एका रिपोर्टनुसार, इतिहासकार अॅंड्रयू स्मिथ यांनी लिहिले आहे की, चार्ल्स क्रेटर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांची पॉपकॉर्न भाजण्याची मशीन 1893 मध्ये वर्ल्ड फेअरमध्ये घेऊन गेले होते. तिथे ते आवाज देऊन लोकांना पॉपकॉर्नची टेस्ट घेण्यासाठी बोलवत होते आणि मशीनसोबत एक बॅग मोफत देणार असं सांगत होते. आज चार्ल्स क्रेटरची कंपनी अमेरिकेतील पॉपकॉर्न भाजणाची मशीन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
असे म्हटले जाते की, कॉर्नचा शोध जवळपास 4 हजार वर्षांआधी न्यू मेक्सिकोमध्ये लागला होता. तेव्हा पॉपकॉर्न वटवाघूळांच्या गुहेत सापडले होते. पण त्यावेळी कुणाला हे माहीत नव्हतं की, हे खाताही येऊ शकतात. त्यामुळे त्यावेळी यांचा वापर सजावटीसाठी केला जात होता. तसेच यापासून डोक्यावर आणि गळ्यासाठी दागिने तयार केले जात होते.