असे म्हटले जाते की, सर्वात जास्त आयुष्य हे कासवाचं असतं. कासव ३०० वर्ष जगू शकतो असं सांगितलं जातं. नुकताच प्राणीमित्रांना एक १०० वर्षाचा कासव मिळाला. हा कासव शेवटी १९०६ मध्ये बघितला गेला होता.
यापेक्षा मोठ्या आकाराच्या कासवाला केलोनोयडिस फेंटेस्टिकस म्हटले जाते. हा कासव प्रशांत महासागराच्या एका द्वीपसमूहाच्या दक्षिण क्षेत्रातील फर्नेनडिना आयलॅंडवर आढळतो. ही मादी आहे. आता या कासवाला नावेतून सांता क्रूझ आयलॅंडवर नेण्यात आलं आहे.
या प्रजातीचे कासव फार दुर्मिळ झाले आहेत. संरक्षणकर्त्यांनुसार, ते या कासवाची जेनेटिक टेस्ट करणार आहेत. या कासवांची प्रजाती वेगाने कमी होत आहे. असे म्हटले जाते की, नाविक पूर्वी प्रवासाला जाताना काही कासव सोबत घ्यायचे. रस्त्यात हे कासव ते खात होते.