General Knowledge : सामान्य ज्ञान हे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी, नोकरीसाठी किंवा जीवन जगताना अनेक कामं करण्यासाठी खूप महत्वाचं ठरत असतं. सामान्य ज्ञानात जगातील वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान कसं मिळवायचं हा तुमचा प्रश्न आहे. कारण ते तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मिळवू शकता जसे की, वृत्तपत्र, पुस्तकं, टीव्ही, ब्लॉग, सोशल मीडिया इत्यादी. आज जरासं सामान्य ज्ञान तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासाठी काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत.
पहिला प्रश्न - भारतात एकूण किती नद्या आहेत?
उत्तर - भारतात जवळपास लहान मोठ्या एकूण ४०० नद्या आहेत.
दुसरा प्रश्न - नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होण्याआधी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
तिसरा प्रश्न - प्लास्टिक बॅन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं?
उत्तर - भारतात प्लास्टिक बॅन करणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आहे.
चौथा प्रश्न - भारतीय रेल्वेचं इंजिन बनवण्यासाठी किती रूपये खर्च येतो?
उत्तर - भारतीय रेल्वेचं इंजिन बनवण्यासाठी साधारण २० कोटी रूपये खर्च येतो.
पाचवा प्रश्न - BYE या शब्दाचा फुल फॉर्म काय होतो?
उत्तर - BYE या शब्दाचा फुल फॉर्म Be with You Everytime असा होतो. अनेकांना वाटतं वाटतं BYE म्हणजे Goodbye चं छोटं रूप आहे. पण असं नाहीये.