जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील पहिली नोकरी लागते तेव्हा त्याला आपली एक वेगळी आणि चांगली इमेज बनवायची असते. पण जर्मनीमध्ये एका इंटर्नने जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. त्याच्या एका चुकीमुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.
या तरूणाला जर्मनीच्या बर्लिन-ब्रॅडेनबर्ग महानगरीय क्षेत्रात जेवीए हिडरिंग तुरूंगात इंटर्नशिप मिळाली होती. त्याच्या मित्रांना त्याच्या नव्या नोकरीबाबत जाणून घ्यायचं होतं. तरूणाला आपल्या मित्रांना दाखवायचं होतं की, त्याची नोकरी किती शानदार आहे. हे दाखवण्यासाठी तरूणाने कथितपणे तुरूंगात स्वत:चा एक फोटो काढला आणि तो मित्रांना पाठवला. त्या फोटोमध्ये तुरूंगाच्या सर्व चाव्यांचा गुच्छा होता. (हे पण वाचा : निर्दोष असूनही २३ वर्षांपर्यंत तुरूंगात रहावं लागलं, आता मिळणार ३.६ कोटी नुकसान भरपाई)
जो फोटो त्याने मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवला होता त्यात तो हातात तुरूंगाच्या सर्वात महत्वपूर्ण चाव्या पकडून होता. यात त्या चाव्या होत्या ज्या सर्व सेल आणि त्यांचे दरवाजे बंद करण्याच्या कामाच्या होत्या. चाव्यांचा फोटो सार्वजनिक झाल्यावर तुरूंग प्रशासन टेंशनमध्ये आलं. कारण या तुरूंगात ६५७ कैदी बंद होते. कुणीही नकली चावी तयार करून तुरूंगातून पळून जाऊ शकलं असतं. (हे पण वाचा : गोलमाल हैं भई! आधी चोरीची कार विकली, पुन्हा चोरी केली तिच कार; CCTV मुळे भांडाफोड...)
अधिकाऱ्यांना चौकशीनंतर समजलं की, इंटर्नचा उद्देश चुकीचा नव्हता. पण त्याने जे केलं त्याने तुरूंगाची सुरक्षा अडचणीत आली असती. या घटनेमुळे तुरूंगाचे सर्व ६०० लॉक बदलावे लागले. घटनेची सूचना न्यायिक अधिकाऱ्यांना गुरूवारी देण्यात आली. तुरूंगाचे प्रवक्ता सबॅस्टियन ब्रूक्स यांनी सांगितले की, सेल आणि सर्व दरवाज्यांचे लॉक आता बदलण्यात आले आहेत.
जुनी सुरक्षा बदलण्यासोबतच जुन्या चाव्या पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. पण यासाठी किती खर्च आला हे समजलं नाही. मात्र, तज्ज्ञांनुसार, सिस्टीम बदलण्यासाठी तुरूंग प्रशासनाला ४४ लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च आला. इंटर्नची इंटर्नशिप समाप्त करण्यात आली आहे.