जगभरात लग्नाला एक पवित्र बंधन मानलं जातं. वेगवेगळ्या धर्मात आपल्या वेगवेगळ्या मान्यता आणि रितीरिवाजानुसार लग्ने लावली जातात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा रिवाजाबाबत सांगणात आहोत ज्यात लग्न करण्यासाठी तरूणाला आधी दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीला चोरून आणावं लागतं.
पश्चिम आफ्रिकेतील वोदाब्बे समाजात लग्नाबाबत असे रिवाज तयार केले आहेत जे वाचून सगळेच हैराण होतात. इथे लग्न करण्यासाठी पुरूषाला आधी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या पत्नीला चोरावं लागतं. अशाप्रकारे लग्न करणं हीच या समाजाची ओळख आहे.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, इथे पहिलं लग्न करण्यासाठी घरातील लोकांची परवानगी गरजेची असते. पण जर विषय दुसरं लग्न करण्याचा असेल तर आधी पुरूषांना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीला चोर करून आणावं लागतं. अशात जे लोक दुसऱ्याच्या पत्नीला पळवून आणू शकत नाही, ते दुसरं लग्न करू शकत नाही.
येथील लोकांमध्ये आजही हा रिवाज कायम आहे. त्यासाठी दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ज्यात तरूण तयार होऊन, आपल्या चेहऱ्यावर रंग लावतात. त्यानंतर ते डान्स आणि आणखी बरंच काही करून दुसऱ्यांच्या पत्नींना रिझवण्याचा प्रयत्न करतात.
पण असं असलं तरी यात याचीही काळजी घ्यावी लागते की, महिलेच्या पतीला याची खबर लागू नये. अशात जर एखादी महिला दुसऱ्या पुरूषासोबत पळून जाते तेव्हा लोक त्या दोघांना शोधून त्यांचं लग्न लावून देतात. ही परंपरा सर्वात वेगळी आहे.
खास बाब ही आहे की या फेस्टिव्हलमध्ये महिला जज बनतात आणि त्या पुरूषांच्या सुंदरतेची टेस्ट करतात. अशात जे पुरूष सर्वात आकर्षक ठरतात, महिला जज त्यांच्यासोबत लग्न करू शकतात, भलेही त्यांचं आधीच लग्न झालं असेल तरी.